एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Kamthi Vidhan Sabha Election 2024 : भाजपच्या प्रदेशाध्यक्षानी राज्यासह कामठीचा गड राखला, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय, काँग्रेसचा दारुण पराभव 

Kamthi Vidhan Sabha Election : कामठी मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने सुरेश भोयर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले होते. 

Kamthi Vidhan Sabha Election 2024 : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु होती. दरम्यान या निवडणुकीच्या निकालाचे अंतिम कौल हाती आले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बहुतांश ठिकाणी दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. तर महायुतीला (Mahayuti) यंदा अभूतपूर्व यश मिळाले आहे. 

दरम्यान, देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर(Nagpur)जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी एक असलेल्या  कामठी विधानसभा मतदारसंघात (Kamthi  Vidhan Sabha Constituency) कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे होते. कारण या मतदारसंघात भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसने सुरेश भोयर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले होते. मात्र यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकहाती सत्ता खेचून आणत दणदणीत विजय मिळवला आहे.

भाजप अन् काँग्रेसच्या थेट लढतीत भाजपच्या हाती गुलाल!

कामठी विधानसभा मतदारसंघ हा 1995 पासून काँग्रेसच्या हातून सुटला आहे. या क्षेत्रावर 2004 सालापासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यात सलग तीन टर्म भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत कामठीचे प्रतिनिधित्व केले, तर गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश भोयर यांचा पराभव करत भाजपचे टेकचंद सावरकर यांनी विधानसभेत प्रवेश केला. यंदा मात्र, निवडणुकीतील विषयांचे सगळेच समीकरण बदलले आहेत. त्यामुळे, भाजपकडून पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तर काँग्रेसने पुन्हा एकदा सुरेश भोयर यांच्यावर विश्वास दर्शवत उमेदवारी दिली आहे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे राजकारणातील बदललेल्या विषयाच्या अनुषंगाने कामठीची निवडणूक अत्यंत काट्याची झाल्याचे निदर्शनास येत आहे. कामठीत विविध पक्षांचे व अपक्ष मिळून एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच झाल्याचे मतदारांच्या आविर्भावावरून स्पष्ट होत आहे. 

गेल्या निवडणुकीत काय झाले?

2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर ही जागा त्यावेळी भाजपच्या प्रभावाखाली होती. या जागेवर भाजपचे चंद्रशेखर भवनकुळे हे तीनदा विजयी झाले होते. त्यानंतर पक्षाने टेकचंद सावरकर यांना तिकीट दिले. त्यांच्यासमोर काँग्रेसचे सुरेश भोयर उभे राहिले. या निवडणुकीत VBA, BSP आणि AIMIM यांनीही आपले उमेदवार उभे केले. मात्र, एकदा जनतेने भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले. जनतेने भाजपच्या टेकचंद सावरकर यांना एकूण 1, 18,182 मते दिली तर काँग्रेसचे सुरेश भोयर यांना 1,07,066 मते मिळाली होती. 

विद्यमान आमदाराचे भाजपने कापले तिकीट

 दलित, मुस्लीम, कुणबी, तेली मतांवर भिस्त असलेल्या कामठी मतदारसंघात लोकसभेत महायुतीला १७ हजार ५३४ मतांचा फटका बसला. त्यामुळे विधानसभेत कामठीचे मैदान वाचविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. येथे भाजपने विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापत बावनकुळे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवला आहे. २०१९ मध्ये भाजपच्या मजबूत संघटनेच्या बळावर सावरकर विधानसभेत पोहोचले होते. त्यामुळे लोकसभेत जरी महाविकास आघाडीला कामठीत लीड मिळाला असला, तरी विधानसभेत बावनकुळेंना रोखताना काँग्रेसला घाम फुटणार आहे.

विधानसभा निवडणूक 2019 निकाल

टेकचंद सावरकर (भाजप) - 1,18,182 मतं - (विजयी) 
सुरेश भोयर (काँग्रेस)- 1,07,066- मतं
राजेश काकडे(वंचित) - 10,601 - मतं

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

 चंद्रशेखर बावनकुळे, भाजप – 1,26,755 (विजयी )
 राजेंद्र मुळक, काँग्रेस – 86,753 
 तापेश्वर वैद्य, शिवसेना – 12,791 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Embed widget