एक्स्प्लोर

जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व

जामनेर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून प्रसिद्धीस आलेल्या गिरीश महाजन यांचा मतदारसंघ. गिरीश महाजन यांचं या एका मतदारसंघावरच नाही संपूर्ण जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित झालंय. जामनेर मतदारसंघातून ते 1995 पासून सलग निवडून येत आहेत.

राज्याच्या राजकारणात वर्षभरापासून ज्यांनी आपली पकड मजबूत केली आहे, असे भाजपचे वजनदार नेते आणि संकटमोचक, आरोग्यदूत अशी ओळख निर्माण करणाऱ्या गिरीश महाजन यांचा हा मतदारसंघ आहे. भाजपात मेगा भरती घडवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे म्हणून गिरीश महाजन यांची ओळख आहे. या मतदारसंघात त्यांची निवडणूक लढविण्याची ही सहावी वेळ असणार आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व जामनेर तालुक्यात गिरीश महाजन यांनी एकहाती वर्चस्व कायम ठेवलेले आहे. महाजन सध्या राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री असून जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी तालुक्यात गिरीश महाजन यांची ‘वोटबँक’ मजबूत करून ठेवली आहे. जामनेर नगरपालिकेवरही भाजपची सत्ता असून त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन येथे नगराध्यक्ष आहेत.  मोठ्या विक्रमाधिक्याने नगरपालिकेवर भाजपाने सत्ता मिळविली आहे. जळगाव जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण : एरंडोल-पारोळा  जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं निवडणूकपूर्व विश्लेषण : जळगाव शहर  जामनेर जिल्हा तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी याच तालुक्यातून रस्ता जातो. जामनेर तालुक्यात कपाशी, हरभरा, मका, चवळी, सोयाबीन, उडीद यांचे पिक शेतकरी घेतात. सर्व घटकांना जोडून ठेवण्यात गिरीश महाजन यशस्वी ठरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण : जळगाव ग्रामीण   नुकत्याच झालेल्या भाजपाच्या मेगाभरतीत गिरीश महाजन यांची महत्वाची भूमिका होती. गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड निर्माण केली आहे. जळगाव मनपा निवडणूक,  जिल्हाध्यक्ष निवड, खासदारकीसाठी उमेदवाराची निवड तसेच इतर पदांच्या नियुक्त्या यांवर गिरीश महाजनांचा वरचष्मा राहिला आहे. यामुळे जिल्ह्याच्या भाजपवर नाथाभाऊ खडसेंचं वर्चस्व कमी झालेले असून ते काहीसे अडगळीत पडल्याचं चित्र दिसून येत आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघ : गिरीश महाजन यांचे एकहाती वर्चस्व जामनेर रेल्वे स्टेशन गिरीश महाजनांविरोधात मागील पंचवार्षिक निवडणुकीत २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिगंबर पाटील यांना ३५, ७६८ मतांनी गिरीश महाजन यांनी पराभूत केले होते. याशिवाय शिवसेनेचे सुभाष तंवर आणि  कॉंग्रेसच्या ज्योस्त्ना विसपुते यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला होता. कॉंग्रेसची मात्र त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला होता. येथे संजय गरुड हेदेखील मातब्बर आहेत. मात्र ते कॉंग्रेसनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेले आहेत. त्यांना तिकीट मिळाल्यास गिरीश महाजन यांना ते कितपत टक्कर देतील हे पाहणं महत्वाचं आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते फोडण्यात गिरीश महाजन यांना यश आले आहे. यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद कमी झाली असल्याचेही चित्र या  मतदारसंघात आहे. गिरीश महाजन यांचा पराभव करण्यासाठी सोनिया गांधी यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यानी यापूर्वी सभा घेतलेली आहे. तरीही गिरीश महाजन अजिंक्य राहिले. गिरीश महाजन यांनी त्यांची एकहाती सत्ता कायम ठेवली असल्याने आताही ते विजयी होतील असे जाणकारांना वाटतं. गिरीश दत्तात्रय महाजन (भाजपा)  – १,०३,४९८ दिगंबर केशव पाटील  (राष्ट्रवादी कॉंग्रेस) – ६७,७३० गिरीश महाजन ३५, ७६८ मतांनी विजयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Election 2024 : पाच लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सुरूवात होणारSpecial Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Embed widget