Sunil Shelke: "शरद पवारांच्या संमतीनं आम्ही सरकारमध्ये, अजितदादांना तोंडघशी पाडलं अन्...", शेळकेंनी केला मोठा दावा
Sunil Shelke: अजित पवारांना एकदा नाही तर तीन वेळा तोंडघाशी पाडलं. केंद्रीय नेतृत्वापुढे तीन वेळा तोंडघशी पाडलं, असं म्हणत आज सुनील शेळकेंनी आज मोठ्या घडामोडींवर भाष्य केलं आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे शिलेदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आज शरद पवारांना (Sharad Pawar) लक्ष्य करत अजित पवारांना तोंडघशी पाडल्याचं सांगत हल्लाबोल केला आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) एकदा नाही तर तीन वेळा तोंडघाशी पाडलं. केंद्रीय नेतृत्वापुढे तीन वेळा तोंडघशी पाडलं, असं म्हणत आज सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) आज मोठ्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. (Pune Political News)
सुनील शेळके (Sunil Shelke) एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, 'शरद पवारांच्या (Sharad Pawar) संमतीनेच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो होतो. ज्यावेळी बैठका सुरु होत्या. त्यावेळी मंत्रिपद देखील फायनल झाले होते. मात्र, त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) तोंडघाशी पाडलं. असं तीन वेळा केंद्रीय नेतृत्वापुढे तोंडघशी पाडलं, मग आम्ही अजित पवारांना (Ajit Pawar) सांगितलं तुम्ही निर्णय घ्या. आम्ही पाठिंबा देतो आणि त्यामुळे आम्ही सहभागी झालो. आता देखील साहेबांचा आम्हाला पाठिंबा होता. त्यामुळे तर प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील भुजबळसोबत आले, असंही ते पुढे बोलताना म्हणालेत.
मोदींसोबतच्या भेटीवेळी काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) भेटीवेळी माझी कागदपत्र पूर्ण नसल्याने मोदींच्या सुरक्षा यंत्रणेने माझी मोदींसोबतची (PM Modi) भेट नाकारली. परंतु अजित पवारांनी (Ajit Pawar) विनंती केली. त्यामुळे माझी त्यांच्याशी भेट झाली. पंतप्रधानाच्या सुरक्षा व्यवस्थेत असं कधीच होतं नाही. मात्र, पहिल्यांदा हे घडलं. केवळ अजित पवारांमुळे (Ajit Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दिल्लीला देखील बोलवलं आहे. मी त्यांना नक्की भेटीसाठी जाईल असंही शेळके (Sunil Shelke) यावेळी म्हणालेत.
आमदार संपर्कात असण्याबाबत काय म्हणाले शेळके?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाचे पाच ते सहा आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच आमच्या सोबत आले तर आश्चर्य वाटायला नको, असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे. दरम्यान आमदार संपर्कात असण्याबाबत बोलताना सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, आमच्या संपर्कात आमदार आहेत. हवेत नक्कीच बोलत नाही. तुम्हाला लवकरच चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल, असंही ते म्हणाले.
त्याचबरोबर मावळ पॅटर्नला सुरुंग लावण्याचं काम झालं आहे. सर्व पक्षीय नेते माझ्या विरोधात होते. मात्र सर्वसामान्य जनतेने माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.