एक्स्प्लोर

Up Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजप देणार मजबूत सरकार, 403 पैकी 325 जागा जिंकणार : योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी 403 पैकी 325 जागा भाजपला मिळणार असल्याचा दावा केला आहे.

Up Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत. उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी जोरात प्रचार सुरू आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी 403 पैकी 325 जागा भाजपला मिळणार असल्याचा दावा केला आहे. भाजप एक दमदार आणि मजबूत सरकार देणार असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले.
    
यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. जे तुमच्या सुख-दु:खात सहभागी नाहीत, त्यांना डोक्यावर घेण्याची काय गरज आहे? त्यांना विसर्जित करण्याची गरज आहे. असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार निशाणा लगावला. समाजवादी पार्टीच्या सरकारच्या काळात रामभक्तांवर गोळ्या झाडल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. आज संपूर्ण जगाचे लक्ष अयोध्येकडे लागले आहे. अयोध्येत पुढच्या वर्षी भव्य राम मंदिर तयार होईल असेही ते म्हणाले. सत्तेत आल्यानंतर समाजवादी पार्पटीने हिला निर्णय घेतला तो दहशतवाद्यांवर असलेले खटले मागे घेण्याचा. सपाचा हात दहशतवाद्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप देखील योगी आदित्यनथ यांनी केला.

तुम्हाला आठवत असेल, मी पाच वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा राम मंदिर बांधू, असे सांगितले होते. त्याचे काम आता सुरू आहे. सपा, बसपाच्या सरकारमध्ये असे घडले असते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आमच्या सरकारने कोरोनाच्या काळात सर्वांना मोफत लस दिली, वीज देताना भेदभाव केला नाही, रेशनही दिले, लोकांना घरे दिली, लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात राज्यातील 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभेच्या जागांसाठी 23 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात एकूण 624 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान होणाऱ्या नऊ जिल्ह्यांमध्ये पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनौ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर यांचा समावेश आहे. राज्यात झालेल्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 59 पैकी 51 जागांवर विजय मिळवला होता. चार जागांवर समाजवादी पक्ष आणि तीन जागांवर बहुजन समाज पक्षाने विजय मिळवला होता. भाजपचा मित्रपक्ष अपना दल या पक्षाने एक जागा जिंकली होती. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 24 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3 : मुंबईच्या पोटातून प्रवास, सुसाट, गारेगार ; मेट्रो 3 मार्गिकेचा ग्राऊंड रिपोर्ट Special ReportAkshay Shinde Encounter : नराधम अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, आरोपांची फायरिंग  Special ReportBadlapur Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने, शवविच्छेदन अहवालातून उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
प्रवाशांचा जीव भांड्यात, अखेर बीडमधून संभाजीनगरसाठी बससेवा सुरू; पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा
Nitin Gadkari : अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 
Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Amit Shah :  'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
Ajit Pawar: महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?; अजित पवारांनी भूमिका स्पष्ट, उमेदवारांचही सांगितलं
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
मंत्री चंद्रकांत पाटील लक्ष देतील का?; पुण्यातील पालकांचा सवाल, इंजिनिअरींगच्या संस्थांकडून होतेय लूट
Embed widget