एक्स्प्लोर

UP Election 2022 : यूपीमध्ये उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान, 59 जागांसाठी 624 उमेदवार रिंगणात

उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे तीन टप्पे झाले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या 23 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी रात्री थंडावल्या.

UP Election 2022 : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामध्ये गोवा, उत्तराखंड आणि पंजाब या तीन राज्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर मणिपूरमध्ये अद्याप मतदान प्रक्रिया बाकी आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे तीन टप्पे झाले आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या 23 फेब्रुवारीला होणार आहे. यासाठीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी रात्री थंडावल्या. चौथ्या टप्प्यात 59 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात राज्यातील 9 जिल्ह्यांतील 59 विधानसभेच्या जागांसाठी 23 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात एकूण 624 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान होणाऱ्या नऊ जिल्ह्यांमध्ये पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनौ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर यांचा समावेश आहे. राज्यात झालेल्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या 59 पैकी 51 जागांवर विजय मिळवला होता. चार जागांवर समाजवादी पक्ष आणि तीन जागांवर बहुजन समाज पक्षाने विजय मिळवला होता. भाजपचा मित्रपक्ष अपना दल या पक्षाने एक जागा जिंकली होती.

या प्रमुख नेत्यांचे भवितव्य पणाला 

चौथ्या टप्प्यात ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अशा काही प्रमुख उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक आहेत. जे लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना दोन वेळा सदस्य राहिलेले सुरेंद्र सिंग गांधी उर्फ ​​राजू गांधी यांच्याशी होणार आहे. पाठक 2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत लखनौ मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. उत्तर प्रदेशचे आणखी एक मंत्री आशुतोष टंडन लखनौ पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरोजिनीनगर विधानसभा जागेवर भाजपने रिंगणात उतरवलेले माजी ईडी अधिकारी राजेश्वर सिंह आणि सपा सरकारमधील माजी मंत्री अभिषेक मिश्रा यांच्यात लढत होणार आहे. डॉ. नीरज बोरा लखनौ उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. येथे त्यांची स्पर्धा विद्यार्थी नेत्या समाजवादी पक्षाच्या पूजा शुक्ला यांच्याशी आहे. यूपी विधानसभेचे उपसभापती नितीन अग्रवाल यांनाही या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. 

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या रायबरेलीतही या टप्प्यात मतदान होणार आहे. रायबरेलीमधून भाजपच्या अदिती सिंह रिंगणात आहेत. यापूर्वी अदिती सिंह काँग्रेससोबत होत्या. हरचंदपूर विधानसभा मतदारसंघातून (रायबरेलीमधील) भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे माजी आमदार राकेश सिंह निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, 3 ऑक्टोबरला लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडले होते. या प्रकरणात गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह अनेक आरोपी आहेत. या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे याचाही भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

या टप्प्याच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हरदोई आणि उन्नावमध्ये समाजवादी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी भाजपला जोरदार टक्कर देत आहे. अशा राजकीय पक्षांपासून सावध राहिले पाहिजे जे आपल्या खुर्चीसाठी देशाला पणाला लावतात आणि देशाच्या सुरक्षेशीही खेळतात, असे म्हणत पंतप्रधानांनी समाजवादी पक्षवर निशाणा साधला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget