Indrajit Sawant : शिवाजी महाराजांबाबतच्या अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यावरुन इतिहास संशोधकांचा संताप; दावा खोडून काढला
Indrajit Sawant on Amit Shah : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे दावे खोडून काढले आहेत.
Indrajit Sawant on Amit Shah, कोल्हापूर : देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आज शिराळा (दि.8) येथे महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. दरम्यान, या सभेत अमित शाह बोलताना शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता आहे. "समर्थ रामदास यांचे पाय या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठींबा देण्याचं काम केलं", असं वक्तव्य अमित शाहांनी केलंय. त्यानंतर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केलाय. शिवाय, इंद्रजीत सावंत यांनी अमित शाहांचे दावे खोडून काढले आहेत.
इंद्रजीत सावंत काय काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. माँसाहेब आणि शहाजी महाराज यांच्या प्रेरणेतूनच 1642 पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. 1642 ते 1672 या कालावधीत शिवाजी महाराजांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदासांचे नाव कागदपत्रांमध्ये कुठेही नोंदवलेलं नाही. त्यामुळे रामदासांनी तरुणांना शिवाजी महाराजांकडे जावून पाठिंबा द्यायला सांगितला आणि त्यांनी तरुण तयार केले ही भाकडकथा आहे. या भाकड कथेच्या आधारावरती भारताचा गृहमंत्री साहेबांनी बोलणं चुकीच आहे, असं इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केलं.
सत्ता के लालच और वोट बैंक के लिए तुष्टीकरण की हदें पार करने वाली MVA महाराष्ट्र का भला नहीं कर सकती। प्रदेश में फिर से NDA ही आने वाली है। सांगली जनसभा से लाइव... https://t.co/I6R5eF9GPz
— Amit Shah (@AmitShah) November 8, 2024
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु केवळ जिजामाता होत्या
संभाजीराजे छत्रपती काय काय म्हणाले, अमित शहा असे बोलले आहेत का या संदर्भात मला कल्पना नाही. संत रामदास त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे असतील. मात्र छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास यांना जोडलं जातं. गुरू म्हणतात मात्र असं कदापिही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु केवळ जिजामाता होत्या. समर्थ रामदास स्वामी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत जोडणं योग्य नाही, हे न पटणारा आहे.
राहुल बाबा और कांग्रेस पार्टी ने महाराष्ट्र की जनसभा में संविधान की प्रति के नाम पर खाली किताब बाँट कर संविधान का अपमान करने का काम किया है। संविधान के नाम पर वोट माँगने वाले राहुल गाँधी संविधान के साथ जालसाजी करते हैं। pic.twitter.com/pQ2npXEQOB
— Amit Shah (@AmitShah) November 8, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या