Gopichand Padalkar : 100 शकुनी मेल्यावर 1 शरद पवार जन्मला, गोपीचंद पडळकर यांची मारकडवाडीत घणाघाती टीका
Gopichand Padalkar :मारकडवाडीतील ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांसह विरोधगकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Gopichand Padalkar on Sharad Pawar : अखंड राज्याचे आणि देशाचे लक्ष आज मारकडवाडीकडे लागून राहिले आहे. इथल्या काही बांधवांचे फोन आम्हाला आले आणि त्यांनी असे सांगितले की, मारकडवाडीतून एकच बाजू महाराष्ट्रासमोर जात आहे. मारकडवाडीतील लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हवा आहे, असं त्यातून सांगितल्या जातंय. मात्र खरंच इथल्या लोकांना बॅलेट पेपरवर मतदान हवं आहे का? माविआला कोणी मतदान केलंय का? हे सर्वांना कळलं पाहिजे, म्हणून आम्ही मारकडवाडीत आलो आहे. मात्र हे मारकडवाडी पार्टन सर्वप्रथम कुणाल दिसलं. हे गाव माझ्या पै-पाहुण्यांचं गाव आहे. 90 टक्के येथे धनगर समाज राहतो. म्हणून माझी जबाबदारी वाढली आणि लक्षात आलं की इथे धनगरांनाच पुढे का करण्यात आलं? म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या प्रक्रियेतून जी निवडणूक पार पडते त्याच्या विरोधात आहे, असं वातावरण निर्माण करण्याचं महापाप शरद पवार यांनी केला आहे. म्हणुन आज आम्ही मारकडवाडी मध्ये आलो आहे.
100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले आहेत. यांचे डोकं बघा, धनगर समाज लोकशाही मनात नाही, असे भासवण्यात आलंय. या विधानसभेत 100 गाव असताना नेमकं माझ्याच मारकडवाडीला कां पुढे करण्यात आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आज सदाभाऊ खोत आणि मी या तुमच्या गावात आलो असल्याचे म्हणत गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) घणाघाती टीका केली आहे.
शरद पवारांनी पहिले आपल्या लेकीचा, नातवाचा राजीनामा घेतला पाहिजे
पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, जे संसद भवन, राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये डौलाने उभे आहे त्याच्या निर्मितीत धनगर समाजाचे योगदान आहे. ज्या जमिनी आहे त्या होळकरांच्या रायसोनी गावातल्या आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणुन शरद पवारांचा डाव उधळून टाकण्यासाठी मी आज या गावात आलो आहे. असे असेल तर शरद पवारांनी आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा पहिले राजीनामा घेतला पाहिजे. जयंत पाटील येथे येऊन गेले त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे. असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. तुम्ही केवळ बळीचे बकरे आम्हालाच करत आहात. म्हणून राज्यातील प्रस्थापितांना आपल्याला उधळून लावावे लागेल असेही ते म्हणले.
हे ही वाचा