एक्स्प्लोर

कोरोनाच्या सावटातही गोकुळ दूध संघासाठीचं मतदान पार, ठरावधारकांचा मतदानाला तुफान प्रतिसाद, 4 मे रोजी निकाल

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघासाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा जोरदार सामना रंगणार आहे. 4 मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघासाठी आज जिल्ह्यातील ठरावधारकांनी चुरशीनं मतदान केलं. कोरोनाचं संकट असतानादेखील ही निवडणूक पार पडली. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. "जवळपास 2,280 मतदार आमच्यासोबत आहेत, त्यामुळे गोकुळ दूध संघ व्यापाऱ्यांचा हातातून शेतकऱ्याच्या हातात जाईल", असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. "आमचे संपूर्ण पॅनेल निवडणूक येईल", असंही ते म्हणाले. करवीर तालुक्यातील आपल्या मतदारांसोबत स्वतः पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Kolhapur Gokul Doodh Sangh Election : कोरोनाच्या सावटात गोकुळ दूध संघासाठी मतदानाला सुरुवात

गोकुळ महासंघाच्या निवडणुकीबाबतीत सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार पी एन पाटील यांनी हा संघ शेतकऱ्यांच्या हातातच आहे, असं प्रत्युत्तर दिलं. कोणत्याच व्यापार्‍यांच्या हातात गोकुळ दूध संघ गेला नाही, हा दूध संघ गेली 30 वर्षे शेतकऱ्यांच्या हातामध्येच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, केवळ मतदानासाठी जात नाही", असा टोला देखील पी एन पाटील यांनी सतेज पाटील यांना लगावला. काही संचालक विरोधकांकडे गेले असले तरी काही फरक पडणार नाही. सत्ताधारी पॅनेल पुन्हा एकदा निवडून येईल असा विश्वास देखील पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 70 मतदान केंद्रांवर ही दूध संघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर एकावेळी जवळपास 50 ते 55 मतदार मतदान करू शकतील असे नियोजन करण्यात आले होते. मतदानादरम्यान ठरावधारकांची एकच गर्दी पाहायला मिळाली.

करवीर तालुक्यातील मतदान कोल्हापुरातील महाविद्यालयात प्रवेशद्वारावर एकाच वेळी सगळे ठरावधारक आले, त्यामुळे मतदान केंद्रावर तुफान गर्दी झाली. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 3,650 मतदार होते. निवडणुकीदरम्यान त्यातील तीन मतदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्यक्षात 3,647 ठरावधारकांनी मतदानाचा हक्क बजावला. ठरावधारकांपैकी आतापर्यंत एकूण 40 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या त्या सर्व मतदारांनी शेवटच्या एक तासामध्ये मतदान केलं. विशेष म्हणजे प्रत्येक मतदाराची मतदान केंद्राबाहेर तपासणी करण्यात आली. या मतदान प्रक्रियेसाठी तब्बल 385 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी 4 तारखेला होणार आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघ पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांच्याच ताब्यात राहणार की मतदार सतेज पाटलांची साथ देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget