(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa Winner List : गोव्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर, वाचा भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
Goa Election Result 2022 : गोव्याचा निकाला जाहीर झाला आहे. गोव्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे, गोव्यात विजयी झालेल्या उमेदवारांची यादी जाणून घेऊया
गोवा : गोव्यातही भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. गोव्या भारतीय जनता पक्षाला 20 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत. आपनंही गोव्यात खातं उघडलंय पण शिवसेना आणि राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही.
गोव्यातील भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी
- प्रविण आर्लेकर ( Pernem मतदारसंघ )
- निलकंठ हलार्नकर ( Tivim मतदारसंघ)
- जोशुव्हा डिसुझा ( Mapusa मतदारसंघ)
- रोहन खवंटे (Porvorim मतदारसंघ)
- अथेनासियस मोन्सेरात (Panaji मतदारसंघ)
- जेनिफर मॉन्सेरेट (aleigao मतदारसंघ)
- प्रेमेंद्र शेट (Maem मतदारसंघ)
- प्रमोद सावंत (Sanquelim मतदारसंघ)
- दिव्या राणे ( Poriem मतदारसंघ)
- विश्वजीत राणे ( Valpoi मतदारसंघ)
- गोविंद गावडे (Priol मतदारसंघ)
- रवि नाईक ( Ponda मतदारसंघ)
- सुभाष शिरोडकर ( Shiroda मतदारसंघ)
- कृष्णा सालकर (Vasco-Da-Gama मतदारसंघ)
- माविन गुदिन्हो (Dabolim मतदारसंघ)
- उल्हास तुयेकर (Navelim मतदारसंघ)
- नीलेश काब्राल (Curchorem मतदारसंघ)
- गणेश गावकर ( Sanvordem मतदारसंघ)
- सुभाष फळदेसाई (Sanguem मतदारसंघ)
- रमेश तवडकर (Canacona मतदारसंघ)
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, परंतु त्यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गोव्यात अनेक मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकले आहे. गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहे. मनोहर पर्रिकरांशिवाय होणारी ही गोवा विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे गोव्यात सत्ता राखण्याचं आव्हान आणखी कठीण होतं. पण भाजप श्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी दिली आणि त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवल्याचे चित्र सध्या सध्या दिसत आहे.
संबंधित बातम्या :