Goa Election Result 2022 Live Updates : गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस

Goa Election Results 2022 Live Updates : भाजप सत्ता कायम राखणार की, काँग्रेस सत्तेत येणार? विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा? अचूक निकाल पाहा एबीपी माझावर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Mar 2022 05:38 PM
Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळी मतदारसंघात 500 मतांनी विजयी

Goa Election Result 2022 :  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले.  गोवा विधानसभा निवडणुकीत  (Goa Assembly Election Result 2022) भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गोवा भाजपने आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना तीन अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने देखील भाजपला पाठिंबा दर्शविला आहे.

Goa Election Result 2022 : उत्तर गोव्यात भाजपची 10 जागांवर आघाडी

Goa Election Result 2022 : उत्तर गोव्यातील 19 जागांपैकी 10 जागा भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत. यासंदर्भात उत्तर गोव्याचे जिल्हाधिकरी अजित रॉय यांनी माहिती दिली आहे.

Goa Election Result 2022 : देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा एकदा

गोव्यात भाजपचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा पुन्हा एकदा चाललाय हे स्पष्ट झालं आहे. गोव्याची जबाबदारी स्वीकारताना उमेदवारांची निवड, अन्य पक्षांतून पक्षात घेतलेले उमेदवार, विविध नेत्यांचे पक्षप्रवेश अशा सार्‍या बाबींवर त्यांनी व्यक्तिश: लक्ष ठेवले आणि बहुतेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले. केवळ उमेदवारांची निवड नाही, तर प्रत्येक मतदारसंघातील प्रचाराची धुराही त्यांनी खांद्यावर घेतली. 

Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, परंतु त्यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. विजयानंतर सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अँटोनियो वास, चंद्रकांत शेट्ये आणि अॅलेक्स रेजिनाल्ड या तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर करून बहुमताचा दावा केला आहे.

Goa Election Results 2022: सत्ता स्थापनेसाठी तीन अपक्षांचा भाजपला पाठिंबा

Goa Election Results 2022: डॉ. चंद्रकांत शेट्ये (डिचोली मतदारसंघ), अँटोनियो वास (कुठ्ठाळी मतदारसंघ), अलेक्सो लॉरेन्को (कुडतरी मतदारसंघ) या तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी 21 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे अपक्षांच्या साथीने गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अपक्षांसह मगोपच्या विजयी आमदारांना सोबत घेऊन काठावरचं नाही तर पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्याचा भाजपचा इरादा आहे. गोव्यात भाजप 19, काँग्रेस १२, मगोप+ 3, आप 02, इतर 04 जागांनी आघाडीवर आहे. 

Goa Election Results 2022: गोव्यात 14 मार्च रोजी भाजपचा शपथविधी होण्याची शक्यता

Goa Election Results 2022: गोव्यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. 14 मार्च रोजी शपथविधी होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 

Goa Election Result 2022: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, 'नोटा'पेक्षाही कमी मते

Goa Election Result 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.  या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे 'नोटा'ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. नोटाला 1.17% मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला

Goa Election Result 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा 500 मतांनी विजय

Goa Election Result 2022: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे. साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, परंतु त्यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला.

Goa Election Result 2022: दक्षिण गोव्याच्या सर्व मतदारसंघातील भाजपचे सर्व उमेदवार आघाडीवर

Goa Election Result 2022: कानकोन, सांगे, कुडचडे, शिरोडा, सावर्डे, प्रियोळ, वास्को, दाबोलीम या दक्षिण गोव्यामधील मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे. या मतदारसंघातील सर्व उमेदवार आघाडीवर असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

Goa Election Result 2022: उत्पल पर्रिकर यांचा 800 मतांनी पराभव

Goa Election Result 2022: पणजी मतदारसंघात अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा 800 मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांचा पराभव केला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

Goa Election Result 2022: गोव्यात चौथ्या फेरी अखेरीस भाजपची मुसंडी, 19 जागांवर आघाडी

Goa Election Result 2022: गोव्यात चौथ्या फेरी अखेरीस भाजपने 19 जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेसला 10, मगोप 04, अपक्ष 03, आम आदमी पक्ष 02, गोवा फॉरवर्ड 01, रिवोरुसणरी गोवन 01 जागांवर पुढे आहेत.

Goa Election Result 2022:  आम्ही बहुमताने सरकार स्थापन करु : विश्वजीत राणे

Goa Election Result 2022:  "गोव्यात भाजपचे सरकार येत आहे. आम्ही बहुमताने सरकार स्थापन करु," अशी प्रतिक्रिया विश्वजीत राणे यांनी दिली. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "मला याबद्दल काही कल्पना नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल." दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा पराभव झाल्यास विश्वजीत राणे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असू शकता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Goa Election Result 2022:  गोव्यात भाजप 18, काँग्रेस 12, मगोप 05, अपक्ष 03 आणि इतर 05 जागांनी आघाडीवर

Goa Election Result 2022:  गोव्यात सर्व जागांचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार भाजपला 18 आणि काँग्रेसला 12 जागांवर आघाडी मिळाली आहे. याशिवाय मगोप 05, अपक्ष 03 आणि इतरांना 02 जागांवर पुढे आहेत. 

Goa Election Result 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं कमबॅक, तिसऱ्या फेरीत 382 मतांनी आघाडी

गोव्यात पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तिसऱ्या फेरीत कमबॅक केलं आहे. साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत यांनी 382 मतांनी आघाडी घेतली आहे. 

Goa Election Result 2022: गोव्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पिछाडीवर

Goa Election Result 2022: गोव्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पिछाडीवर आहेत. दक्षिण गोव्यात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (भाजप) केपे मतदारसंघातून दोन हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर देखील पिछाडीवर आहेत. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील साखळी मतदारसंघात पिछाडीवर आहेत.

Goa Election Result 2022: गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत

Goa Election Result 2022: आतापर्यंतच्या कलांनुसार गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 15 जागांवर पुढे आहेत. तर तृणमूल-मगोपला सात आणि इतरांना तीन जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे इथे तृणमूल-मगोप आणि इतर किंगमेकर ठरण्याची शक्यता 

Goa Election Result 2022: मांद्रेम मतदारसंघात मगोपचे जीत अरोळकर आघाडीवर

Goa Election Result 2022: मांद्रेम मतदारसंघात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, भाजप उमेदवार दयानंद सोपटे पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात मगोपचे  जीत अरोळकर आघाडीवर आहेत.

Goa Election Result 2022: उत्पल पर्रिकर यांना मागे टाकत भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात आघाडीवर

Goa Election Result 2022: पणजी मतदारसंघात उत्पल पर्रिकर यांना मागे टाकत भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात आघाडीवर गेले आहे. भाजपला 14, काँग्रेसला 17 जागांवर आघाडी मिळाली आहे. 


 

Goa Election Result 2022: पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रिकर आघाडीवर

गोवा विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून आघाडीवर आहे. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला 14 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर काँग्रेसने 17 जागांवर आघाडी मिळवली आहे. याशिवाय तृणमूल-मगोप चार जागांवर पुढे आहेत.  

Goa Election Result 2022: कलांमध्ये 13 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर

गोवा विधानसभा निवडणुकीच्या कलांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. 13 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. याशिवाय तृणमूल-मगोप चार जागांवर पुढे आहेत.  

Goa Election Result 2022: मी निवडून येईन याचा मला विश्वास : लक्ष्मीकांत पार्सेकर

मी निवडून येईन याचा मला विश्वास आहे. भाजपने माझा विश्वासघात केला आणि मी काँग्रेससोबत कधीच नव्हतो म्हणून निवडून आल्यानंतर मी राज्याचं हित पाहिन, अशी प्रतिक्रिया लक्ष्मीकांत पारसेकर यांनी मतमोजणीपूर्वी दिली.  

Goa Election Result 2022: गोव्यातील पहिले कल हाती

गोवा विधानसभा निवडणुकीचे पहिले कल हाती आले आहेत. काँग्रेस सात जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला चार जागांवर आघाडी मिळाली आहे. याशिवाय तृणमूल-मगोप दोन जागांवर पुढे आहेत.

Goa Election Result 2022 Live : दोन जागांचे कल हाती, भाजप आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी

Goa Election Result 2022 Live : दोन जागांचे कल हाती, भाजप आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी

Goa Election Result 2022 Live : दोन जागांचे कल हाती, भाजप आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी

Goa Election Result 2022 Live : दोन जागांचे कल हाती, भाजप आणि काँग्रेसला एका जागेवर आघाडी

Goa Election Result 2022: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात

सर्व मतदान केंद्रांवर पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली आहे. दरम्यान, 11 वाजेपर्यंत गोव्यामधील चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे. काँग्रेसचे नेते  दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.


उमेदवार आणि पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम आताच उघडण्यात आले आहेत. सर्वात आधी पोस्टल मते मतमोजणी हॉलपर्यंत घेऊन येतील. दक्षिण गोव्याची मतमोजणी दामोदर कॉलेजमध्ये होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचिका कातियाल यांनी दिली.



Goa Election Result 2022: मतमोजणीआधी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची दत्त मंदिरात पूजा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतमोजणीआधी आपला मतदारसंघात साखळीमधील दत्त मंदिरात पूजा केली.


 

Goa Election Result 2022: काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांना हॉटेलवर ठेवणार, फुटीच्या शक्यतेने काँग्रेसची रणनीती 

आमदार फुटू नयेत म्हणून काँग्रेसची विशेष रणनीती आखली आहे. निवडणुकीतील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांना हॉटेलवरच ठेवलं जाणार आहे. उमेदवारांना मतमोजणीसाठी बाहेर सोडलं जाणार नाही. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डमध्ये मडगाव इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर अपेक्षित उमेदवार निवडून आल्यास इतरांच्या मदतीने भाजप देखील तात्काळ सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं कळतं.

Goa Election Result 2022: पणजी मतदारसंघावर सगळ्यांची नजर

यंदा गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघावर सगळ्यांची नजर असेल. या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर रिंगणात आहेत. उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे अतानासियो मोनसेरेट, काँग्रेसचे अमित पालेकर आणि आम आदम पक्षाचे उमेदवाराचं भवितव्य पणाला लागलं आहे.

Goa Election Result 2022: सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सराळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. इथे 14 फेब्रुवारी रोजी 40 जागांच्या विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झालं होतं.

Goa Election Result 2022: यंदा पाच माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात

यंदा गोवा विधानसभा निवडणुकीत 5 माजी मुख्यमंत्री मैदानात आहेत. यामध्ये दिगंबर कामत (काँग्रेस), रवी नाईक (भाजप), चर्चिल अलेमाओ (टीएमसी), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष) आणि प्रमोद सावंत (भाजप) यांचा समावेश आहे.

Goa Election Results 2022 Live : गोवा विधानसभेचे जलद आणि अचूक निकाल फक्त एबीपी माझावर

Goa Election Results 2022 Live : गोवा विधानसभा निवडणुकांचे जलद आणि अचूक निकाल तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता. त्याशिवाय तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही पाहू शकता. 


ABP Majha You Tube LIVE :


ABP Majha LIVE TV : https://marathi.abplive.com/live-tv


ABP Majha WEB Site : https://marathi.abplive.com/

Goa Election Results 2022 Live : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्याचा सत्ताधीश कोण?

Goa Election Results 2022 Live : गोव्यात विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती राहील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. त्यामुळे सगळेच पक्ष सतर्क झालेत. निकालाआधीच भाजपनंही खलबतं सुरू केली होती. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करण्याची तयारी आधीपासूनच सुरु झाली होती. अशातच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्याचा सत्ताधीश कोण असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Goa Election Results 2022 Live : गोव्यात कुणाची प्रतिष्ठा पणाला?

Goa Election Results 2022 Live :



  • प्रमोद सावंत (भाजप) - साखळी 


डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधीही मंत्री झाले नाहीत. परंतु 2019 साली गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर भाजप नेते आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत विराजमान झाले. 



  • दिगंबर कामत (काँग्रेस) - मडगाव

  • मनोहर आजगावकर (भाजप) - मडगाव

  • अमित पालेकर (आप) - सांताक्रूझ

  • मायकल लोबो (काँग्रेस) - कळंगुट

  • उत्पल पर्रिकर (अपक्ष) - पणजी


उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. पणजीतून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत.



  •  बाबूश मोन्सेरात (भाजप) - पणजी

Goa Election Results 2022 Live : गोव्यात भाजप सत्ता राखणार?

Goa Election Results 2022 Live : गोव्यात मुख्य लढत जरी काँग्रेस-भाजपमध्ये होत असली, तरी उत्पल पर्रीकरांसह अनेक अपक्षांनी देखील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. सोबतच शिवसेना देखील या निवडणुकीत जोमाने उतरलेली पाहायला मिळाली

Goa Election Results 2022 Live : गोव्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

Goa Election Results 2022 Live Updates : आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result 2022) जाहीर होणार आहे. मतदारांनी कोणाच्या पारड्यात जनमताचा कौल दिला ते स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार सामना रंगल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. दोघांमध्ये मोठी स्पर्धा असून, भाजप सत्ता कायम रखणार की, काँग्रेस सत्तेत येणार हे सांगता येत नाही. मात्र कॉंग्रेस आणि भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने आता  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर  गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा?  या विषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे.

पार्श्वभूमी

Goa Election Results 2022 Live Updates :  आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result 2022) जाहीर होणार आहे. मतदारांनी कोणाच्या पारड्यात जनमताचा कौल दिला ते स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार सामना रंगल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. दोघांमध्ये मोठी स्पर्धा असून, भाजप सत्ता कायम रखणार की, काँग्रेस सत्तेत येणार हे सांगता येत नाही. मात्र कॉंग्रेस आणि भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्यानं आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा? या विषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे.


मुख्य लढत जरी काँग्रेस-भाजपमध्ये होत असली तरी उत्पल पर्रीकरांसह अनेक अपक्षांनी देखील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. सोबतच शिवसेना देखील या निवडणुकीत जोमाने उतरलेली पाहायला मिळाली


गोव्यात  कुणाची प्रतिष्ठा पणाला?


 प्रमोद सावंत (भाजप) - साखळी 
डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधीही मंत्री झाले नाहीत. परंतु 2019 साली गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर भाजप नेते आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत विराजमान झाले. 


दिगंबर कामत (काँग्रेस) - मडगाव
मनोहर आजगावकर (भाजप) - मडगाव
अमित पालेकर (आप) - सांताक्रूझ
मायकल लोबो (काँग्रेस) - कळंगुट
उत्पल पर्रिकर (अपक्ष) - पणजी
उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. पणजीतून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत.


 बाबूश मोन्सेरात (भाजप) - पणजी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.