एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीत भाजपचे चार आमदार फेल, पक्षश्रेष्ठींच्या रडारवर; आशिष शेलारांच्या मतदारसंघात निकमांना नाममात्र आघाडी

Mumbai Lok Sabha: मुंबईतही महायुतीची जादू फारशी चालली नाही. निकालाअंती मुंबईचे किंग ठाकरेंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुंबईतील सहापैकी चार जागा ठाकरेंनी लढवल्या होत्या, त्यापैकी तीन जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

Lok Sabha Election 2024: मुंबई: महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक (Maharashtra Lok Sabha Election 2024) निकालांत महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aaghadi) धुरळा उडवल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचा निवडणूक निकालांत 30 जागांवर विजय झाला असून महायुतीला (Mahayuti) केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अशातच महायुतीत भाजपला (BJP) केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं असून गेल्यावेळी भाजपला 23 जागांवर विजय मिळाला होता. मुंबईतही (Mumbai) महायुतीची जादू फारशी चालली नाही. निकालाअंती मुंबईचे किंग ठाकरेंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुंबईतील सहापैकी चार जागा ठाकरेंनी लढवल्या होत्या, त्यापैकी तीन जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. म्हणजेच, मुंबईतील सहापैकी चार जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत. 

महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईतील भाजप आमदारही निवडणुकांतील खासदारांना बहुमत मिळवून देण्यात कमी पडले. लोकसभा निवडणुकीच्या निकालांत भाजपच्या मुंबई अध्यक्षांसह चार आमदार फेल झाले आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या विधानसभेत उज्ज्वल निकमांना नाममात्र आघाडी मिळाली आहे. तर, महायुतीला आशिष शेलारांकडून फक्त 3 हजार 606 मतांची आघाडी घेता आली. भाजपच्या 3 आमदारांच्या मतदारसंघात तर महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा लढवत असलेल्या राहुल शेवाळेंनाही आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांचा फारसा फायदा मिळालेला नाही. सेल्वन यांच्या मतदारसंघात शेवाळे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 9 हजार 312 मतांनी पिछाडीवर होते. याशिवाय मिहीर कोटेचा यांनाही घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा फारसा उपयोग झाला नाही. राम कदमांच्या मतदारसंघातून कोटेचांना तब्बल 15 हजार 772 मतांचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. 

महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडलेले विधानसभा आमदारांचे मतदारसंघ

  • कॅप्टन तमिल सेल्वन : सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे 9 हजार 312 मतांनी पिछाडीवर
  • राम कदम : घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून  15,772  मतांनी पिछाडीवर
  • भारती लव्हेकर : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर 21 हजार 090 मतांनी पिछाडीवर

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदी, शाहांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता वर्वण्यात आली आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याचा निर्णयावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण विचार करुन पुढील निर्णय घेईन, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 PmVidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget