अंबादास अखेरचे पाच दिवस कुठे होता? स्वतःच प्लॅन करायचा, आम्हाला काहीच करुन देत नव्हता, चंद्रकांत खैरेंचा निशाणा
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर टीका केलीय.
Chandrakant Khaire on Ambadas Danve : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालाचे अंतिम कल हाती आले आहेत. बहुतांश जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरल्याचे दिसून आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळं भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर टीका केलीय. अंबादास अखेरचे पाच दिवस कुठे होता? याबाबत काहीच माहित नाही. स्वतःच प्लॅन करायचा, आम्हाला काहीच करुन देत नव्हता, अशी टीका खैरे यांनी केली आहे.
भाजपचा विजय झाला शिंदे गटाचे अधःपतन झाले
मी दुःखी आहे, जिथं सैनिक असतात तिथं विजय होतो आमदार होते पैसे वाटले, भाजपचा विजय झाला शिंदे गटाचे अधःपतन झाले, आमच्या 6 जागा आल्याचे खैरे म्हणाले. अंबादास अखेरचे 5 दिवस कुठे होता माहीत नाही, माझा फोन घेत नव्हता, अनेकांनी कॉल केल्याचे खैरे म्हणाले. तो स्वतः प्लॅन करायचा आम्हाला काहीच करू देत नव्हता त्याने लक्ष दिले नाही आम्हाला काम करू दिले नाही.
भाजपकडे पैसे आहेत, शिंदेंकडे पैसे आहेत, आमच्याकडे नाहीत
कदाचित भवितव्य काही गाठायचे असेल त्याला म्हणून लक्ष दिले नाही अशी टीका खैरे यांनी केली. दरम्यान, इकडे काय झालं मुंबईत बैठक घेऊन परिस्थिती मांडणार असल्याचे खैरे म्हणाले. भाजपकडे पैसे आहेत, शिंदेंकडे पैसे आहेत, आमच्याकडे नाहीत असे खैरे म्हणाले.आम्हाला लोक विचारतात काय झालं उत्तर तर द्यावे लागेल असही खैरे म्हणाले. रशीद मामुमुळे खूप परिणाम झाला आहे. मी अजूनही रशीद मामु ला आमचा उमेदवार मानत नाही अशी टीका खैरे यांनी केली. माझा कुणाशी वाद नाही, मला कुणी विचारले नाही मी जबाबदार आहे अंबादासचे मला माहिती नाही अशी टीका खैरे यांनी केली.
छत्रपती संभाजीनगरात कोणाला किती जागा मिळाल्या?
छत्रपती संभाजीनगरात एकूण 115 जागांसाठी मतदान झाले होते. 15 जानेवारी रोजीच्या मतदानानंतर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण 58 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही चांगलाच जोर लावला होता. शिवसेनेची मात्र येथे निराशा झाली आहे. शिवसेनाला फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर फक्त 6 जागा मिळाल्या आहेत.
मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका असणाऱ्या छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. महापालिकेच्या 115 जागांसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. संभाजीनगरच्या महापालिकेवर कोणाचा भगवा फडकणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. भाजप 97 जागांवर निवडणूक लढवत असून शिंदे सेना 92 जागी निवडणूक लढवत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 97 जागा तर काँग्रेस 77 अजित पवारांचे राष्ट्रवादी 77 आणि एमआयएम 48 जागांवर निवडणूक लढवत आहे.





















