Assembly Elections 2023 : पाच राज्ये, 16 कोटी मतदार, 679 मतदारसंघ, विधानसभेचा धुरळा, मतदानाच्या तारखा जाहीर!
Assembly Elections 2023: पाच राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे.
Election Commission Press Conference: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा (Assembly Election 2023 Dates) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि17, नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर, मिझोरममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबरला (Five State Election Result) रोजी होणार आहे.
पाच राज्यात सोळा कोटीपेक्षा अधिक मतदार आहे. पाच राज्यात 679 जागांवर मतदान होणार आहे. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहे. मतदानासाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. आदिवासी भागात PVTG मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना व्होट फ्रॉम होम करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोरममध्ये साडे आठ लाख, छत्तीगडमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि और तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.
कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five state voting & counting dates)
- मिझोरम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram voting date)
- छत्तीसगड - 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh voting date)
- मध्यप्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh voting date)
- राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी मतदान (Rajasthan voting date)
- तेलंगाणा - 30 नोव्हेंबर रोजी मतदान
- पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी
5 States Assembly polls | Chhattisgarh to vote on 7th Nov & 17th Nov; Madhya Pradesh on 17th Nov; Mizoram on 7th Nov, Rajasthan on 23rd Nov and Telangana on 30th Nov; Results on 3rd December pic.twitter.com/jV7TJJ9W4A
— ANI (@ANI) October 9, 2023
17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार
पाच राज्यांमध्ये 8.2 कोटी पुरुष मतदार आहेत. 17 ऑक्टोबरला मतदान यादी प्रसिद्ध होणार असून, 23 ऑक्टोबरपर्यंत मतदान यादी सुधारण्याची संधी मतदारांना असणार आहे. 17,734 मॉडेल मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.
हे ही वाचा :