एक्स्प्लोर

पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप

Pune Crime News: कारमध्ये पॅकबंद बॉक्समध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Five Crore Cash Siezed From Car: पुणे-बंगळुरु महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी रात्री एका वाहनातून पाच कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता असताना कारमध्ये पॅकबंद बॉक्समध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रूपयांची रोख रक्कम (5 Crore Cash Siezed From Car) पकडली. पोलीसांनी रक्कम जप्त केली. मात्र ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले. पाच कोटी जप्त केल्यानंतर पोलीस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी,  प्रांताधिकारी आणि आयकर विभाग अधिकाऱ्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं. 

गाडी कोणाच्या नावावर?

कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच कोटी रुपयांची रक्कम कुठुन आली होती, कुठे निघाली होती आणि हे पाच कोटी रूपये कोणाचे आहेत?, याची माहिती देण्यास ना पोलीस , न प्रांताधिकारी ना निवडणूक विभागाचे अधिकारी, ना आयकर विभागाचे अधिकारी तयार झाले. दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली, ती गाडी  MH 45 AS 2526 या क्रमांकाची असून ती सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. 

सदर कारवाईबाबत कोणीही उत्तर देण्यास तयार नाही-

सदर कारवाईबाबत पोलीस निरिक्षक राजेश गवळी, प्रांत अधिकारी यशवंत माने आणि निवडणूक अधिकारी यांना कॅमेरासमोर प्रश्न विचारलेत , मात्र एकानेही उत्तर दिलेले नाही. ज्यांच्याकडे ही रक्कम सापडली त्यांनाही कॅमेरासमोर प्रश्न विचारलेत . मात्र कोणीही उत्तर दिलेले नाही.

संजय राऊतांचे धक्कादायक आरोप-

कारमध्ये 5 कोटी रक्कम हस्तगत झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके? संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे. 

भोरमध्ये 5 कोटींची रोख रकक्म सापडलेली गाडी मोठ्या सत्ताधारी नेत्याशी संबंधित-सूत्र, Video:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Embed widget