Exit Polls 2023 Live Updates : राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

ABP Cvoter Exit Poll Results : पाच राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान पार पडलं असून त्याच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. 

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 30 Nov 2023 08:39 PM

पार्श्वभूमी

ABP Cvoter Exit Poll 2023 Live : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या पाचही राज्यांच्या मतमोजणीचा निकाल 3 डिसेंबर रोजी...More

Madhya Pradesh Election Exit Poll : भाजपला धक्का, काँग्रेसचे कमलनाथ मध्य प्रदेशमध्ये सत्ता मिळवणार, एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Madhya Pradesh Election Exit Poll : मध्य प्रदेशमध्ये भाजपला सत्ता गमावण्याची शक्यता असून काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 125 जागा मिळण्याची शक्यता असून भाजपला 100 जागावर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. 


मध्य प्रदेशमधील एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? (Madhya Pradesh Election Exit Poll)



  • काँग्रेस - 125 

  • भाजप - 100

  • बसपा - 02 

  • एकूण जागा - 230