एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : निवडणूक चिन्हांवर शेतकरी, गृहिणींच्या उपयोगी साधनांसह डिजिटल साधनांचा प्रभाव

2014 च्या निवडणुकांमध्ये 87 मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करुन यावर्षी 198 मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन दिली आहेत.

मुंबई  :  लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा  दुपटीनहून अधिक वाढ करण्यात आली आहे. 198 निवडणूक चिन्हे ‘मुक्त चिन्हे’ (फ्री सिम्बॉल्स) घोषित करण्यात आली असून त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येतो. राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. 2014 च्या निवडणुकांमध्ये 87 मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करुन यावर्षी 198 मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन दिली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाते. दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करुन आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे. जुन्या काळातील वाळूचे घड्याळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाईपरायटर, डिझेल पंप ते आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस,सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राईव्ह, रोबोट, हेडफोन अशा नव्या-जुन्याचा संगम या मुक्त चिन्हांमध्ये करण्यात आला आहे. व्यक्तिगत वापराच्या वस्तूंना स्थान, हेल्मेटद्वारे सुरक्षेचा संदेश आपल्याला सकाळी उठल्यापर्यंत लागणाऱ्या टूथब्रश, टूथपेस्ट पासून ते रेझर, साबणदानी, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे. मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करुन आयोगाने एक प्रकारे दुचाकी चालकाच्या जिवीताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे. शेती आणि शेतकऱ्याला मान देणारी चिन्हे या चिन्हांमध्ये ऊस शेतकरी (गन्ना किसान), नारळाची बाग, डिजेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश करुन असून एकप्रकारे शेतीचे महत्त्व लक्षात घेतले आहे. स्वयंपाकघरातील साधनांचा मोठा वापर गॅस सिलेंडर, गॅस शेगडी, रेफ्रीजरेटर, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, तळण्याची कढई (फ्राईंग पॅन), काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता, शिमला मिर्ची,फूलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नासपती (पीअर्स), फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक आदींच्या रुपात मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे. यासोबत रिक्षा, ट्रक, हेलिकॉप्टर, जहाज अशी रस्ते तसेच जलवाहतुकीची साधने, विटा, थापी, करवत, कडी, कुलपाची चावी असे बांधकाम साहित्य, बॅट, बुद्धीबळ पट, कॅरम बोर्ड, फूटबॉल,ल्युडो, स्टम्प, हॉकी स्टीक आणि बॉल, टेनिस रॅकेट आणि बॉल अशी खेळांची साधने तसेच क्रिकेट फलंदाज, फूटबॉल खेळाडू, मोत्यांचा हार, हिरा, अंगठी असे मौल्यवान दागिने, हार्मोनियम,सितार, व्हायोलीन अशी संगीताची साधने यांच्यासोबतच अनेक विविध क्षेत्रातील चिन्हेही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
Embed widget