Election 2022: मतदार यादीत नाव आहे पण मतदार कार्ड हरवलं? काळजी नको...तुम्हीही मतदान करू शकता
Lost Voter ID Card: मतदार कार्ड हरवलं असलं तरी तुम्ही इतर कागदपत्रांच्या आधारे मतदान करु शकता. तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.
![Election 2022: मतदार यादीत नाव आहे पण मतदार कार्ड हरवलं? काळजी नको...तुम्हीही मतदान करू शकता Election 2022 Name is in the voter list but voter card is lost know how to check name Election 2022: मतदार यादीत नाव आहे पण मतदार कार्ड हरवलं? काळजी नको...तुम्हीही मतदान करू शकता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/3a4cfd6abda6905778022c593b999991_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Assembly Election 2022: उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणूका एकूण सात टप्प्यात पार पडणार आहेत. आता जर तुमचं मतदान कार्ड हरवलं असेल किंवा गहाळ झालं असेल तर मतदान कसं करावे हा प्रश्न पडला असेल? तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जर तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट असेल तर तुम्ही मतदान करू शकता.
मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तुम्ही सहज शोधू शकता -
अशा पद्धतीने मतदार यादीत नाव शोधा,
- मतदार यादीत नाव शोधण्यासाठी तुम्ही Electoralsearch.in या वेब साईटवर जा.
- त्यानंतर तुम्ही येथे लॉगिन करा.
- येथे तुम्हाला नाव तपासण्याचे दोन मार्ग सापडतील. एक म्हणजे नाव, जन्म तारीख आणि इतर तपशील टाकून शोधा.
- दूसरं म्हणजे EPIC/Voter ID Card No, क्रमांक टाकून तुमचे नाव तपासू शकता.
- EPIC क्रमांकाला मतदार ओळख क्रमांक देखील म्हणतात.
- या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही मतदार यादीतील तुमचे नाव शोधू शकता.
याशिवाय निवडणूक आयोगाच्या 1800111950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवता येईल.
मतदान करण्यासाठी या पर्यायी कागदपत्रांचा वापरु शकता
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- चालक परवाना
- बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक
- राज्य किंवा केंद्र सरकारचा सेवा आयडी
- मनरेगा कार्ड
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) स्मार्ट कार्ड (NPR स्मार्ट कार्ड)
- पेन्शन दस्तऐवज
- साक्षांकित फोटो मतदार स्लिप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)