एक्स्प्लोर

Eknath Shinde On Raj Thackeray: राज ठाकरेंसोबत संबंध बिघडले?; एकनाथ शिंदे म्हणाले, माहीमवरुन थोडा दुरावा, कधीही वाद..., VIDEO

Eknath Shinde On Raj Thackeray: माहीमवरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत थोडा दुरावा निर्माण झाला, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Eknath Shinde On Raj Thackeray मुंबई: महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत नाही, आमची शर्यत विकासाची..., असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एबीपी माझाच्या EXCLUSIVE मुलाखतीत केला आहे. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी नेमका फॉर्म्युला ठरलेला नसल्याचंही स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलं आहे. माहीमवरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत थोडा दुरावा निर्माण झाला. काही बाबींवर वेळेवर चर्चा व्हायला हवी होती, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये माहीम विधानसभा मतदारसंघावरुन तुमचे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे संबंध गडबडलेत का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आमच्यात कम्युनिकेशन गॅप नक्की झालेला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. माहीमवरुन राज ठाकरेंसोबत थोडा दुरावा निर्माण झाला. तसेच शेवटी राज ठाकरे देखील एका पक्षाचे प्रमुख आहेत. मी देखील मुख्यमंत्री आणि एका पक्षाचा प्रमुख आहे. कार्यकर्ता जपायचा असतो, पक्ष चालवायचा असतो, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. 

राज ठाकरे आमचे चांगले मित्र- एकनाथ शिंदे

काही गोष्टींची वेळेवर चर्चा होणे आवश्यक असते. काही बाबींवर वेळेवर चर्चा व्हायला हवी होती, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. आमच्यात कधीही वाद होऊ नये अशी माझी इच्छा असते आणि हीच त्यांची देखील असते. राज ठाकरेंसोबत आमच्यात मतभेद किंवा विसंवाद नाही. पण राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं. 

हलक्यात घेणे म्हणजे नक्की काय?, एकनाथ शिंदे म्हणाले...

एबीपी माझाच्या या मुलाखतीमध्ये तुमचं एक वाक्य चांगलंच गाजतंय ते म्हणजे मला हलक्यात घेतलं आणि मी सरकार उलटवलं,  हलक्यात घेणे म्हणजे नक्की काय?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्यांना सांगत होतो. आपण शिवसेना भाजप म्हणून लढलो आहे. आपण मोदीजी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून प्रचार केला आहे आणि लोकांनी त्यामुळे आपल्याला मतदान केलं आहे. पुन्हा आपण शिवसेना भाजप असं सरकार आणूया पुन्हा सगळं झालं गेलेले विसरून जाऊयात, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.

राज ठाकरेंसबोतचे संबंध बिघडले? एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, Video:

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray: भाषण संपताच स्टेज खचला; उद्धव ठाकरे कडेकडेनं उतरले, ठाण्यात नेमकं काय घडलं?, Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget