(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमोल किर्तीकरांच्या पराभवाचं गणित एकनाथ शिंदेंनी गजानन किर्तीकरांसमोरच सांगितलं!
Amol Kirtikar vs Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली होती.
Eknath Shinde on Amol Kirtikar vs Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात अमोल किर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली होती. शिंदेंच्या वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा फक्त 48 मतांनी पराभव केला. अमोल किर्तीकर यांच्या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून वेगवेगळे आरोप कऱण्यात आले. यासंदर्भात पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. आता याप्रकरणावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेय. त्यांनी आपल्या भाषणामध्ये रवींद्र वायकर यांच्याविजयाचं गणित मांडलं. पण त्यावेळी स्टेजवर अमोल किर्तीकर यांचं वडील गजानन किर्तीकर उपस्थित केले. त्यांच्यासमोरच शिंदेंनी वायकरांच्या विजायाचं गणित मांडलं. त्याशिवाय ईव्हीएम हॅकबाबत ठाकरे गटाच्या आरोपावर टीका केली. जर ईव्हीएम हॅक करता आली असती, तर राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव यांनाही निवडून आणले असते, असे शिंदे म्हणाले.
रवींद्र वायकर यांच्या विजयानंतर ईव्हीएम हॅक केलं, ओटीपी टाकला, असा सशंय व्यक्त केला जात आहे. पण तिथे कोणता मोबाईल फोन लाऊन EVM हॅक केलं होतं, पण संशय का ? आम्ही कोणता OTP टाकला? रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिव्हारी लागला. रवींद्र वायकरला ते हरवण्याची भाषा करत आहेत, मी काय गप्प बसू काय? वायकर यांचा विजय जनतेचा विजय आहे. मेरिटवर काढलेला विजय आहे. खऱ्या शिवसेनेचा विजय आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मला त्यांच्याबाबत वेगळी मते होती.त्यांना माझ्याबाबत वेगळी मते होती.हे कोण करत होते .पण आता त्यांना कळलं की हा माणूस सच्चा आहे .आमच्यात वाद उभे केले पण नियती कोणाला माफ करत नाही, असे शिंदे म्हणाले. खोटा आणि रडा पक्ष आहे UBT... त्यांना रड्या गट बोलू असाही टोला यावेळी त्यांनी लगावला.
दक्षिण मुंबईत यामिनी जाधव पराभव झालं... कशाच्या जीवावर कोणाच्या मताने जिंकले... राहुल शेवाळे यांचे असेच आहे... गोवंडी, ट्रॉम्बे, धारावी, अनुषक्तिनगर ल लीड गेला. तिथे कोणता मोबाईल फोन लाऊन EVM हॅक केला होतं..करू का संशय आम्ही की कोणता OTP टाकले.
त्यावेळी नेमकं काय झालं होतं ?
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. आता किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
आणखी वाचा :
Eknath Shinde Speech : घासून-पुसून नाही तर ठासून विजय मिळवला, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल