एक्स्प्लोर

कालिदास कोळंबकरांनी आधी काँग्रेसचा राजीनामा द्यावा नंतर शिवसेनेचा प्रचार करावा : एकनाथ गायकवाड

मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेत दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना कोळंबकरांनी पाठिंबा जाहीर केला होता. यावरुनच गायकवाडांनी कोळंबकरांवर टीका केली आहे.

मुंबई : कालिदास कोलंबकर यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा अशी टीका मुंबई दक्षिण-मध्यचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेत दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना कोळंबकरांनी पाठिंबा जाहीर केला होता. यावरुनच गायकवाडांनी कोळंबकरांवर टीका केली आहे. राजकारणात प्रत्येकाने नैतिकता पाळली पाहिजे, तसेच नेते गेले म्हणजे जनता जाते असं होत नाही, जनता आमच्याबरोबर आहे असे मतं कोळंबकरांनी व्यक्त केलं आहे. मुंबईतील सायन प्रतीक्षानगरमध्ये भव्य बाईक रॅली काढली त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान या रॅलीत मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. VIDEO | कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा नंतर शिवसेनेचा प्रचार करावा : एकनाथ गायकवाड | मुंबई | एबीपी माझा कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वीच कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसले होते. दादरमधील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपचा रस्ता धरला आहे. त्यामध्ये कोळंबकरांच्या रुपाने आणखी एकाची भर पडली आहे. कालिदास कोळंबकरांना जनता जागा दाखवेल : संजय निरुपम मुंबई वायव्य मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी नाराज काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर टीका केली आहे.  गेल्या 2 वर्षांपासून भाजपच्या संपर्कात असलेल्या कोळंबकरांना येत्या दोन ते तीन महिन्यात जनता जागा दाखवले असं मतं निरुपम यांनी व्यक्त केल आहे. तसेच प्रचारादरम्यान उमेदवार संजय निरुपम यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.तर येत्या काही दिवसात मुंबईत राहुल गांधींची सभा होणार असल्याचं निरुपम म्हणाले. VIDEO | कालिदास कोळंबकरांना जनता जागा दाखवेल : संजय निरुपम | मुंबई | एबीपी माझा संबंधित बातम्या काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये, राहुल शेवाळेंना पाठिंबा

महत्त्वाच्या बातम्या

Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget