एक्स्प्लोर

Voter List Revision : ... तर मतदार यादीतून तुमचंही नाव गायब, महाराष्ट्रात मतदार याद्यांची मॅपिंग सुरु, 2002 च्या यादीशी तुमचं नाव जुळतंय का?

Maharashtra Election Commission PC : केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदीची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

Maharashtra Voter List Revision : राज्यात एसआयआर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून कमी केलं जाणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम (S. Chockalingam) यांनी दिलं. 2002 सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केलं जाणार असून त्यामध्ये आपलं किंवा आपल्या पालकांचं नाव जुळतंय का हे पाहण्याचं आवाहन त्यांनी केलं. 

राज्यातील एसआयआर प्रक्रिया ही 29 जुलै पर्यंत सुरू राहणार असून मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करणार आहेत. तसेच बीएलओ घरी आल्यानंतर कुणी उपस्थित नसेल तर त्यांना 29 जुलै नंतरही त्यांचे नाव नोंदवता येणार असल्याचं चोकलिंगम म्हणाले. तसेच महाराष्ट्रातल्या 72 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाल्याची माहितीही चोकलिंगम यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या मोहिमेतंर्गत राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष घरसमान पडताळणी केली जाणार आहे. या मोहिमेवर महाविकास आघाडीने (MVA) गंभीर आक्षेप घेतल्यानंतर, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम (S. Chockalingam) यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट केली आहे.

एस. चोकलिंगम यांनी सांगितले की, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून विनाकारण वगळले जाणार नाही. या कामासाठी राज्यात तब्बल 1 लाख 253 बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. जनगणनेचे काम संपल्यावर लगेचच या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

BLO Door To Door Survey : 1 लाखांहून अधिक BLO घराघरांमध्ये जाणार

राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या तपशिलाची खातरजमा केली जात आहे. यासाठी 1 लाखांहून अधिक बीएलओ कर्मचारी घराघरात जाऊन पडताळणी करणे, डुप्लिकेट नावे शोधणे, स्थलांतरित मतदारांची माहिती अपडेट करणे आणि जुन्या याद्यांशी मॅपिंग करण्याचं काम करणार आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी रि-डेव्हलपमेंट सुरू असल्याने जे नागरिक दुसरीकडे राहायला गेले आहेत, त्यांनी स्थानिक बीएलओशी संपर्क साधून फॉर्म भरून द्यावा, असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे.

Voter ID Self Mapping : ऑनलाईन 'Self-Mapping' चा पर्याय उपलब्ध

मुंबई आणि इतर मोठ्या शहरी भागांमध्ये संथ गतीने काम होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदारांना एक मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती डिजिटल पद्धतीने अपडेट करता यावी, यासाठी आयोगाने 'Online Self-Mapping' चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. बीएलओच्या पडताळणी प्रक्रियेत नागरिकांना त्यांची अधिकृत कागदपत्रे सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाईल, ज्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही.

Election Commission Schedule : मतदार यादी पुनरीक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक

20 ते 29 जून 2026 : गणना अर्जांची छपाई तसेच बीएलओ (BLO) कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

30 जून ते 29 जुलै 2026 : मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील.

5 ऑगस्ट 2026 : प्रारूप मतदार याद्यांची (Draft Voter List) अधिकृत प्रसिद्धी केली जाईल.

5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 : मतदारांना प्रारूप यादीवर आपले दावे आणि हरकती नोंदवता येतील.

3 ऑक्टोबर 2026 पर्यंत : प्राप्त झालेले सर्व दावे आणि हरकती निकालात काढल्या जातील.

7 ऑक्टोबर 2026 : महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी (Final Voter List) प्रसिद्ध केली जाईल.

SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

सध्या SIR ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. राज्यातील अनेक भागामध्ये SIR सर्वे केला जात आहे. यासोबत ज्यांची नाव SIR मध्ये नसतील त्यांचे नाव मतदार यादीत वगळ्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे. SIR काय आहे? 2002 च्या  लिस्टमध्ये आपलं नाव आहे की नाही? यासोबत आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव कसे अॅड करायचे? याची संपूर्ण अशी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

सर्वात आधी आपण SIR काय आहे? ते समजून घेऊयात...

Special Intensive Revision म्हणजेच SIR.. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मतदार यादी दुरुस्ती करणे. पण याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डिप्लिकेट मतदार वगळ्यात येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये अॅड केले जाते.

अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान बीएलओ (BLO - बूथ लेव्हल ऑफिसर) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात.

या प्रक्रियेत नक्की काय होते?

बीएलओ स्वतः घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही, याची खात्री करतात.

काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात.

मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावे यादीतून वगळली जातात.

18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातात.

2002 च्या SIR लिस्टमध्ये नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जायचं आहे, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे.

त्यानंतर लॉगिन करून घ्यायचं आहे.

त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील.

01. Search your name in SIR यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ टाकून तुमचं नाव या यादीत आहे की नाही ते चेक करायचं आहे.

02. आणि दुसरं ऑप्शन आहे Last SIR E-Roll यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव किंवा मतदान केंद्र टाकल्यानंतर तुम्हाला VIEW यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर लिस्ट आली असेल. त्यात तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा. जर नसेल तर तुम्हाला SIR यादीत नाव अॅड करावं लागेल.

त्यासाठी तुम्हाला तुमचं मतदारकार्ड, आधारकार्ड आणि तुमच्या पालकांचं नाव 2002 च्या SIR यादीत असणं बंधनकारक आहे.

बीएलओ (BLO) पडताळणीसाठी तुमच्या घरी आले आणि त्यांना असे आढळले की तुम्ही त्या पत्त्यावर आता राहत नाही (स्थलांतरित झाले आहात) किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तरच नाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget