एक्स्प्लोर
मावळ-शिरुरमध्ये युतीतील फूट कायम, भाजप आमदारांच्या गुप्त बैठकीची चर्चा
शिवसेना-भाजप युतीचे मावळ लोकसभेतील उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरुर लोकसभेतील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील रोष भाजप नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त केला गेला.
पिंपरी चिंचवड : मावळ-शिरुर लोकसभेतील युतीत फूट कायम आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील भाजप नगरसेवकांची गुप्त बैठक पार पडली. युतीचे मावळ लोकसभेतील उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरुर लोकसभेतील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील रोष व्यक्त केला गेला.
'शिवसेनेच्या या दोन्ही खासदारांनी गेली दोन वर्षे आरोपांची सरबत्ती केली. अशा उमेदवारांचा प्रचार आम्ही करणार नाही', अशी भूमिका भाजप नगरसेवकांनी एकमताने घेतली. परंतु युतीचा धर्म पाळावा लागेल, अशी सावध भूमिका आमदार जगताप आणि लांडगे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र जगताप-बारणे यांच्यातील वैर आणि लांडगे-आढळराव यांच्यात श्रेयावरुन रंगलेलं शीतयुद्ध पाहता हे दोन्ही आमदार वर-वर युतीधर्म दाखवत असल्याचीच चर्चा आहे.
मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर
एकीकडे जगतापांना गेल्या लोकसभा निवडणुकांचा वचपा काढायचा आहे, तर लांडगेंना शिवसेनेच्या कोट्यातील भोसरी विधानसभेची जागा भाजपकडे वळवायची आहे. यासाठीच नगरसेवकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही लढाई लढली जात असल्याचं बोललं जात आहे. भाजपचे दोन आमदार आणि 50 ते 60 नगरसेवक युतीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. पण युतीच्या दोन्ही उमेदवारांनी आमच्याशी योग्य तो संवाद साधला, तर प्रचाराचा विचार करु असा निर्णय घेऊन आजची बैठक उरकण्यात आली. पण भाजपची सध्याची ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा उमेदवार पार्थ पवार आणि शिरुर लोकसभा उमेदवार अमोल कोल्हे यांच्या पथ्यावर पडणारीच ठरेल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement