एक्स्प्लोर
Advertisement
धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा, 50 जागांसह स्पष्ट बहुमत
धुळे महानगरपालिका निवडणूक 2018 निकाल : भाजपने 50, काँग्रेसने सहा, तर राष्ट्रवादीने आठ, (आघाडी एकूण 14) जागा, एमआयएमला चार जागा जिंकल्या. शिवसेना, समाजवादी पक्षाला जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्राम केवळ एका जागेवर जिंकलं. तर बसप एका जागेवर विजयी झाली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
धुळे : धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली.
भाजपने 50, काँग्रेसने सहा, तर राष्ट्रवादीने आठ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. एमआयएमने चार जागांवर खातं उघडलं. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
धुळे आणि अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकांची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झाली. धुळ्यात काल (रविवारी) 60 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 74 जागा असलेल्या धुळे महापालिकेत बहुमताचा आकडा 38 होता.
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली होती. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी कांटे की टक्कर दिली. मात्र अखेरीस भाजपने 49 जागांवर निर्विवाद विजय मिळवला.
धुळे महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो-पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या भाजपच्या तीन मंत्र्यांनी धुळ्यात तळ ठोकला होता. त्यामुळे भाजपच्या तिन्ही मंत्र्यांना धुळ्यात विजय मिळवण्यात यश आल्याचं दिसत आहे.
महाजन-गोटे यांची खडाजंगी
धुळ्यातील भाजपच्या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन आणि अनिल गोटे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. भाजपने ईव्हीएममध्ये घोटाळे करुन विजय मिळवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. भाजप गुंडांचा पक्ष असून बाहेरुन आणलेल्या गुंडांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
धुळे महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्ये
निकाल : भाजप 49, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 9, एमआयएम 3, शिवसेना 2, समाजवादी पक्ष 2, लोकसंग्राम 1, बसप 1, अपक्ष 2 Dhule Municipal Elections 2018 Live Updates अनिल गोटे यांची पत्नी हेमा गोटे विजयी एमआयएमने खातं उघडलं, धुळ्यात MIM चे दोन उमेदवार विजयी भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत, 39 जागांवर आघाडीवर भाजप 39, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 18, शिवसेना 7, लोकसंग्राम 3, इतर 7 जागांवर आघाडीवर भाजपची जोरदार मुसंडी, 31 जागांसह आघाडीवर, बहुमतापासून केवळ 7 जागा दूर भाजप 31, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 28, शिवसेना 3, लोकसंग्राम 3, इतर 2 जागांवर आघाडीवर भाजप 25, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 17, शिवसेना 3, लोकसंग्राम 2, इतर 2 जागांवर आघाडीवर भाजप 23, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 15, शिवसेना, 2, लोकसंग्राम 2, इतर 2 जागांवर आघाडीवर अनिल गोटे यांची पत्नी आणि लोकसंग्रामच्या महापौरपदाच्या उमेदवार हेमा गोटे आघाडीवर भाजप 22, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 15, लोकसंग्राम 2, सपा 1 जागेवर आघाडीवर प्रभाग 14 मध्ये भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर भाजप 16, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 12, लोकसंग्राम 1, सपा 1 जागेवर आघाडीवर भाजप 4, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 2, लोकसंग्राम 1, सपा 1 जागेवर आघाडीवर धुळे महापालिकेत अनिल गोटेंचा लोकसंग्राम पक्ष एका जागेवर आघाडीवर धुळे महापालिकेचा पहिला कल हाती, भाजप दोन जागांवर आघाडीवर पोस्टल मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात पहिला कल अनिल गोटेंचं काय होणार? स्वपक्षीयांनाच आव्हान देणाऱ्या अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही, असा अंदाज स्थानिक पत्रकारांनी वर्तवला आहे. अनिल गोटे यांनी पत्नी हेमा गोटे यांना महापौरपदाची उमेदवार घोषित केली आहे. मतदानाच्या दिवशीच अनिल गोटे यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. विरोधकांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप, यावेळी अनिल गोटेंनी केला. मात्र गोटेंना स्टंटबाजीची जुनी खोड असल्याचा प्रतिहल्ला भाजप खासदार सुभाष भामरेंनी केला. नाराज अनिल गोटेंनी गेल्या महिन्यात राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन त्यांना थोपवून धरलं. त्यानंतर पक्षाने फसवणूक केल्याचा दावा करत गोटे यांनी राजीनामा दिला आणि नव्या पक्षाची घोषणा केली. भाजपकडे झुकतं माप भाजपला मात्र चांगल्या जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीलाही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज बांधला जात आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे या भाजपच्या तीन मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा मुद्या भाजपने अग्रस्थानी ठेवला. विशेष म्हणजे मागील तीन दिवसांपासून हे तिघं मंत्री धुळे शहरात तळ ठोकून होते. शिवसेना-मनसे-लोकसंग्राम एकत्र ज्या प्रभागात लोकसंग्रामचे उमेदवार नाहीत, त्या प्रभागात शिवसेनेच्या पाच उमेदवारांना लोकसंग्राम पक्षाने पाठिंबा दिला आहे. ज्या प्रभागात शिवसेनेचे उमेदवार नाहीत, अशा 13 वॉर्डात लोकसंग्रामच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे गुंडगिरीमुक्त धुळे शहरासाठी मनसेनेही लोकसंग्रामला पाठिंबा दिला आहे. समाजवादी पक्ष बिनविरोध धुळे महापालिकेतील 74 पैकी एक जागा बिनविरोध निवडून आली. प्रभाग क्रमांक 12 'अ' मध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. धुळे महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्यं बहुमतासाठी 38 सदस्य संख्या ज्या पक्षाकडे, त्याची महापालिकेवर सत्ता 59.64 टक्के मतदान कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणं उत्सुकतेचं भाजपचे तीन मंत्री, शिवसेनेच्या एका मंत्र्यासह दोन आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला हद्दवाढीनंतर प्रथमच दहा गावातील ग्रामस्थांनी बजावला महापालिका मतदानाचा अधिकार खरी चुरस भाजप विरुद्ध भाजप, तर शिवसेना, लोकसंग्राम आणि मनसे यांचा एकमेकांना पाठिंबा भाजपवगळता अन्य सर्व पक्षांचा गुंडगिरीमुक्त शहराचा नारा स्थानिक पत्रकार आणि मतदारांच्या अंदाजानुसार कोणत्या पक्ष किती यश मिळेल याची आकडेवारीही समोर आली आहे. निकालापूर्वीचा धुळेकरांचा कौल पक्ष जागा लोकसंग्राम पक्ष 5 भाजप 29 शिवसेना 7 काँग्रेस-राष्ट्रवादी 28 इतर 5 एकूण 74 संबंधित बातम्या महानगरपालिका निवडणूक : धुळ्यात 60 तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान Dhule Election Update : 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज अहमदनगर, धुळ्यात मतदारांचा कौल कुणाला? महापालिका निवडणूक : धुळ्यात आमदार गोटे यांच्या गाडीवर दगडफेक, मतदानाला सुरुवात धुळे महानगरपालिकेसाठी उद्या मतदान, प्रशासन सज्जअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement