रवी राणा यांचं बोधचिन्ह खूप छान आहे, "पाना" ते आता कोणा-कोणाचा नट कसतील सांगता येत नाही; देवेंद्र फडणवीस यांचा मिश्किल टोला
Election 2024: रवी राणा यांचे निवडणूक बोधचिन्ह फार खास आहे. ते म्हणजे पाना. त्यामुळे आता ते कुणाकुणाचे नट कसतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असा मिश्किल टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
Maharashtra Assembly Election 2024: खऱ्या अर्थाने रवी राणा (Ravi Rana) यांच्या प्रचाराची आवश्यकता नाही. कारण रवी राणा यांचे कामच बोलतंय. त्यांचे काम बघता त्यांच्यासाठी मत मागण्याची गरज नाही. कारण ते स्वतः जनतेच्या मनात आहेत आणि जे मनात असतात तेच मतांमध्ये दिसून येतात. महायुतीमध्ये (Mahayuti) भारतीय जनता पक्षाला (BJP) 152 जागा मिळाल्या. पैकी चार जागा या आम्ही आपल्या मित्र पक्षांना सोडल्या. त्यातली एक जागा युवा स्वाभिमान पक्षाला, एक जागा आरपीआय आठवले त्यांच्या करता, एक सुराज्य पक्षा करता, तर एक आरएसपी करता सोडलीय. त्यातलीच एक जागा महायुतीमध्ये रवी राणांच्या पक्षाला देण्यात आली आहे.
असे असले तरी रवी राणा यांचे निवडणूक बोधचिन्ह फार खास आहे. ते म्हणजे पाना. त्यामुळे आता ते कुणाकुणाचे नट कसतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आम्हालाही काही लोकांचे नट कसायचे आहे. त्यामुळे गरज पडल्यास तुमचा देखील पाना घेऊन जाऊ आणि काही लोकांचे नट कसू, असा मिश्किल टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.
येत्या काळात 1 कोटी महिलांना लखपती दीदीचे उद्दिष्ट
खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या लोकांचे डोक्याचे नट आम्हाला कसायचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला एक मंत्र दिला आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत 50% असलेल्या महिलांना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणावं लागेल. बेटी पढाव, बेटी बढावं पासून ते लखपती दीदी पर्यंतच्या योजना पंतप्रधान मोदींनी आखले आहेत. राज्यात 11 लाख महिलांना आपण लखपती दीदी केलं आहे. येत्या काळात 1 कोटी महिलांना लखपती दीदी करून देशाच्या आर्थिक केंद्रस्थानी आणायचे आहे. राज्यात पुन्हा आमच्या सरकार आले तर लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये नाही तर 2100 रुपये अति महिना आम्ही देऊ, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे. ते अमरावती येथे बोलत होते.
कठीण काळात नवनीत राणा, रवी राणा यांनी आम्हाला साथ दिली
महिलांना एसटी मध्ये सवलत सुरू केलीय. घरचे पैसे वाचतील म्हणून बहिणी या एसटीमध्ये प्रवास करताय. तोट्यात गेलेली एसटी आज फायद्यात गेली आहे. महाविकास आघाडीचे लोक न्यायालयात गेले. सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा म्हणताय. पण न्यायालयाने ती लाडकी बहीण योजना सुरूच ठेवलीय. त्यामुळे रवी राणाजी तुमचा पाना आम्हाला द्या, यांचे नट कसायचे आहे. हे शेतकर्यांचे सरकार आहे. जर सत्ता आली तर आपण शेतकरी कर्जमाफी करणार आहोत, असा निर्णय आम्ही घेतलाय. कठीण काळात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आम्हाला साथ दिली आहे. रवी राणा निवडून येईल आणि त्यांना रेकॉर्ड मतांनी निवडून द्या, यासाठी मी तुमच्यात आलो आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा