एक्स्प्लोर

एकनाथ शिंदे, अजित पवारांचे आभार, महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग दंडवत, पहिल्या भाषणात देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले. तसेच, महाराष्ट्रातल्या जनतेला सांष्टांग दंडवत घातलं आणि विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणाला देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली.

Devendra Fadnavis Full Speech: महायुतीला विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळालं. अशातच आता महायुतीकडून मुख्यमंत्री कोण? यावर गेले अनेक दिवस खलबतं सुरू होती. अशातच आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याचं उत्तर अवघ्या महाराष्ट्राला मिळाला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीसच आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे. आज झालेल्या भाजप कोअर कमिटी बैठक आणि भाजप विधीमंडळ पक्ष बैठकीत भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अशातच आज विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यासोबत महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले. तसेच, महाराष्ट्रातल्या जनतेला सांष्टांग दंडवत घातलं. त्याचप्रमाणे, फडणवीसांनी 'एक है, तो सेफ है' हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केल्याचंही वक्तव्य केलं. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सगळ्यांचे आभार की, एकमतानं माझी विधीमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. 'एक है, तो सेफ है' हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो. इथं मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो, त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीवर्षी मी त्यांना नमन करतो. भगवान बिरसाामुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन, आपले सगळ्यांचे लाडके श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना नमन करतो."

"आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू, 2019 साली जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवानं तो कौल हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केली होती. सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात आपल्या आमदांराना त्रास दिला गेला तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही, माननीय मोदीजींचे मी आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं, एक वर्ष फक्त 72 तासांसाठीच होतो, पण टेक्निकली मुख्यमंत्रीपदी होतोच, त्यामुळे यंदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं... आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नाही, लार्जर इंटरेस्टमध्ये आपण एकत्र काम करू, कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही मनाविरुद्ध होतात, तरीही लार्जर इंटरेस्टमध्ये आपण सगळ्यांशी जुळवून घेऊ...", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)

महायुती : 237
मविआ : 49
अपक्ष/इतर : 02
---------------------
एकूण : 288

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)

भाजपा : 132
शिवसेना (शिंदे गट) : 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 41
काँग्रेस : 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : 10
शिवसेना (ठाकरे गट) : 20
समाजवादी पार्टी : 2
जन सुराज्य शक्ती : 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी :  1
राष्ट्रीय समाज पक्ष : रासप : 1
एमआयएम : 1 जागा
सीपीआय (एम) : 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय : 1
राजर्षी शाहू विकास आघाडी : 1 
अपक्ष : 2

भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष

  • जनसुराज्य शक्ती  : 2
  • युवा स्वाभिमान  : 1
  • रासप : 1
  • अपक्ष : 1 (शिवाजी पाटील- चंदगड)

भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137

पाहा व्हिडीओ : Devendra Fadnavis Maharashtra New CM : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUT

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget