एक्स्प्लोर
Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : विदर्भात काय होणार
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'सी व्होटर' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे.
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'ए.सी. नेल्सन' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. 48 मतदारसंघात 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचून नेल्सनच्या प्रतिनिधींनी हा सर्व्हे केला आहे. निवडणुका घोषित होण्याचा आणि उमेदवार ठरण्याच्या काळात हा सर्व्हे केला गेला. या सर्व्हेत मतदारांना आपल्या नेत्यांकडून अपेक्षा काय आहेत? विकासाचे मुद्दे, कोण जिंकेल? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
VIDEO | विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा | कौल मराठी मनाचा | मूड महाराष्ट्राचा | एबीपी माझा
या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील विदर्भात असलेल्या 10 लोकसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा झालेला पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेनुसार अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर नागपुरातून नितीन गडकरी यांचा विजय होणार असून भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादीच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
VIDEO | विदर्भात 'हे' उमेदवार जिंकणार | कौल मराठी मनाचा | मूड महाराष्ट्राचा | एबीपी माझा
कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
बुलढाणा - शिवसेना
अकोला - भाजप
अमरावती - शिवसेना
वर्धा- भाजप
रामटेक- काँग्रेस
नागपूर - भाजप
यवतमाळ/वाशीम - शिवसेना
चंद्रपूर - भाजप
भंडारा / गोंदिया - भाजप
गडचिरोली / चिमूर - भाजप
2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी
एनडीए - 49.6 टक्के
युपीए - 36.9 टक्के
अन्य - 13. 5 टक्के
2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात होणाऱ्या मतदानाची टक्केवारी (अंदाज)
एनडीए :- 48 टक्के
युपीए :- 37 टक्के
वंचित आणि अन्य :- 2 टक्के
इतर :- 13टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement