एक्स्प्लोर

देवळाली विधानसभा मतदारसंघ : घोलप कुटुंब विजयी घौददोड कायम राखणार?

क्षम उमेदवाराचा अभाव, शिवसेनेचा झंजावात या कारणामुळे गेल्या 30 वर्षापासून देवळाली मतदारसंघ आणि घोलप कुटुंब हे समीकरण राहील आहे. याही निवडणुकीत घोलप विजयी घौददोड कायम ठेवतात का याकडे लक्ष लागलंय.

शिवसेनेचा गड अशी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाची ओळख. शिवसेनच्या माध्यमातून घोलप कुटुंबीयांनी गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघावर एकहाती आपल वर्चस्व कायम राखलं आहे. युती सरकारच्या काळात बबनराव घोलप यांच्या माध्यमातून राज्याला सामाजिक न्याय मंत्री आणि मतदारसंघाला लाल दिवा लाभला. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सैनिकांमध्ये बबनराव घोलापंच नाव घेतल जात. बबनराव सलग पाच वेळा निवडणून आले आहेत. दोन वेळा अपक्ष निवडणूक लढविली 1985 ला भाजपच्या भिकचंद दोंदे यांनी त्यांचा पराभव केला. तर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने 1999 ला शिवसेनेच्या तिकिटावर न लढता अपक्ष निवडणूक लढवून विजयी मालिका कायम राखली. भ्रष्टाचारच्या एका प्रकरणात बबनराव घोलप यांना शिक्षा झाली. निवडणूक लढविण्यास 6 वर्षे बंदी घालण्यात आली. त्यामुळे एनवेळी घोलप यांनी मुलगा योगेश ला 2014 च्या निवडणुकीच्या रणांगणात उतरविले. त्यानेही वडिलांची विजयी पताका उंचावत ठेवली. शिवेनेचा बालेकिल्ला अबधित राखला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना 41 हजार 933 मतांची आघाडी मिळाल्याने शिवेनेचा गड मजबूत असल्याचा संदेश गेला. मात्र लोकसभा आणि विधानसभाचे निवडणुकीत फरक असतो. मुद्दे ,आव्हान वेगळी असतात. त्यातच योगेश घोलप यांना टक्कर देण्याच्या तयारीत अनेकानी दोन तीन वर्षापासून मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केल्याने घोलप पितापुत्रांची प्रतिष्टा पणाला लागली आहे. घोलप पितापुत्राकडून सलग पाच वेळा मात खाणारे रामदास सदाफुले भाजपकडून याहीवेळी इच्छुक आहेत. भाजप नगरसेविका सरोज आहेर, शिवसेना, मनसे असा प्रवास करुन भाजपत सध्या स्थिरावलेले प्रताप मेहरोलिया भाजपकडून इच्छुक आहेत. यात राजश्री अहिरराव या नावाचा समवेश होतय. अहिरराव सध्या तहसीलदार आहेत प्रशासकीय कामकाज करत असतानाच त्यांनी राजकीय मुस्देगीरीचा वापर करत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली. त्यांचाही कल भाजपकडे आहे, मात्र हे सर्व इच्छुक शिवसेना भाजप यांच्यातील युती तुटण्याची वाट बघत आयेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्षमण मंडाले यांनी तीन वर्षापासून गावागावात जाऊन भेटीवर भर दिला. दीपक वाघ हा तरुण चेहरा, बबनराव घोलप यांचे पुतणे रविकिरण घोलप, सुनील कोथमिरे अशी नाव चर्चेत आहेत. काँग्रेसने फारसा या मतदार संघाकडे रस दाखविला नाही. तर नुकतीच विचीत आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे पवन पवार नाशिक पूर्व पाठोपाठ याही मतदारसंघात चाचपणी करतायेत. प्रा संजय जाधव हेही वंचित कडून इच्छुक आहेत. 30 टक्के शहरी आणि 70 टक्के ग्रामीण भाग अशी या मतदारसंघाची रचना आहे. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प, देवळाली छावणी परिषद, स्वातंत्रवीर विंनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी भगूर, शिंदे-पळसे सारख्या ग्रामपालिकांचा समावेश देवळाली मतदारसंघात होतो. एकलहरे विद्युत प्रकल्पातील वीज संच एकापाठोपाठ एक बंद पडतायेत. 640 मेगावॉटचा संच सुरु होत नाही. कामगारांच्या हाताला काम नसल्याने हंगामी कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे.  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे नाही. प्राथमिक दवाखाने सुस्थितीत नाही. शाळाचा दर्जा चांगला नाही. व्यवसायिक शिक्षण देणारे महाविद्यालय नाही. नदी प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची समस्या असे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष जैसे थे आहेत. मात्र सक्षम उमेदवाराचा अभाव, शिवसेनेचा झंजावात या कारणामुळे गेल्या 30 वर्षापासून देवळाली मतदारसंघ आणि घोलप कुटुंब हे समीकरण राहील आहे. याही निवडणुकीत घोलप विजयी घौददोड कायम ठेवतात का याकडे लक्ष लागलंय. विधानसभेसाठी 2014मध्ये झालेले मतदान
  • योगेश घोलप- शिवसेना- 49,751
  • रामदास सदाफुले- भाजप- 21,540
  • नितीन मोहिते- राष्ट्रवादी काँग्रेस- 18,402
  • प्रताप मेहरोलिया- मनसे- 15,001
  • गणेश उन्हवणे- काँग्रेस- 9,115
लोकसभेसाठी 2019 मध्ये झालेले मतदान
  • हेमंत गोडसे- शिवसेना- 80,688
  • समीर भुजबळ- राष्ट्रवादी- 38,755
  • पवन पवार- वंचित आघाडी- 24,459
  • माणिकराव कोकाटे- अपक्ष- 10,096

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Embed widget