एक्स्प्लोर

दर्यापूर विधानसभा मतदारसंघ : राखीव मतदारसंघाचं प्राक्तन, स्थानिकांना डावलून बाहेरचे उमेदवार लादल्याचं शल्य!

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा दोन तालुके आणि अचलपूरमधल्या काही गावांचा मिळून बनलाय. हा मतदारसंघ राखीव असल्याने अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव कॅ. अभिजीत अडसूळ यांना इथून उमेदवारी दिली जाते. पण 2014 साली शिवसेनेचा हा गड भाजपने जिंकला आहे.

दर्यापूर मतदार संघ हा अंजनगाव सूर्जी, दर्यापूर तालूका आणि अचलपूर तालुक्यातील काही भाग मिळून बनलेला विधानसभा मतदारसंघ आहे. 1990 पूर्वी काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या या मतदार संघावर गेल्या 30 वर्षापासून हिंदुत्वाचा झेंडा फडकत आहे. दर्यापूर मतदार संघावर 1990 पूर्वी काँग्रेस, आरपीआय आणि फॉरवर्ड ब्लॉकचे प्रतिनिधी सभागृहात निवडून गेले आहेत. 1990 ला झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेने दर्यापूर मतदार संघात आपला उमेदवार रिंगणात उतरवला. या पहिल्याच निवडणुकीत दर्यापूर येथील प्रकाश पाटील भारसाकळे हे आमदार म्हणून निवडून आले. ते 2009 पर्यंत मतदारसंघ राखीव होईपर्यंत प्रत्येक निवडणुकीत विजयी होत गेले.
2009 च्या मतदारसंघ फेररचनेत दर्यापूर हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. फेररचनेनंतर शिवसेनेच्या कॅ. अभिजीत अडसूळ यांनी दर्यापूरमधून निवडणूक जिंकल्यामुळे दर्यापूर हा शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढले आणि दर्यापूरमधून शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. या निवडणुकीत शिवसेनेच्या कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचा पराभव करुन भाजपचे रमेश बुंदिले आमदार झाले. यावर्षी होणाऱ्या 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे मतदार संघात मोठा पेच निर्माण होणार आहे.  दर्यापूर हा मतदार संघ शिवसेनेकडे जाणार की भाजपला मिळणार याचा निर्णय घेताना श्रेष्ठींची कसोटी लागणार आहे. शिवसेनेचा दावा हा गेली 25 वर्षे मतदार संघावर असलेल्या वर्चस्वावर आधारीत आहे. तर भाजपचा दावा हा 2014 च्या निवडणूक निकालावर आहे, कारण भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांनी 2014 ला जिंकलेल्या जागांबाबत चर्चाच होणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलंय.
विद्यमान आमदार रमेश बुंदिले आणि त्यांचे समर्थक युती झालीच तर दर्यापूर भाजपकडेच राहिलं पाहिजे, यासाठी आग्रही आहेत, तर तर शिवसेनेचे पदाधिकारीही सुध्दा आपलाच दावा मजबूत आहे असं समजून कामाला लागले आहेत. शिवसेनेकडून अंजनगाव सुर्जी शहरातून अविनाश गायगोले आणि गजानन लवटे तर दर्यापूरमधून बबन विल्हेकर हे कट्टर शिवसैनिक सेनेचा गढ कायम राहावा यासाठी कंबर कसून आहेत तर वंचित बहुजन आघाडीतर्फे संतोष कोल्हेही यांचे नाव समोर येत आहे.
2009 ला हा मतदार संघ आरपीआयच्या वाट्याला गेला असतांनाही अपक्ष उमेदवार बळवंत वानखडे यांनी सेनेचे कॅ. अभीजीत अडसूळ यांना चांगली टक्कर दिली होती. तर 2014 ला दर्यापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्या लढतीतही बळवंत वानखडे यांनीच भाजपच्या रमेश बुंदिले यांना टक्कर दिली. त्यामुळे बळवंत वानखडे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी, यासाठीही प्रयत्न होत आहेत. 2009 पासून मतदारसंघ राखीव झाल्याने या मतदार संघावर स्थानिकांपेक्षा बाहेरुन आलेल्या अभिजीत अडसूळ शिवसेनेने उमेदवारी दिली. आजही तिच परिस्थिती आहे.
भाजपतर्फे विद्यमान आमदार रंमेश बुंदिले यांच्यासह सीमा सावळे भाजपतर्फे इच्छुक आहेत. सहा महिन्यांपासून त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. तर काँग्रेसतर्फे सुधाकरराव तलवारे, श्रीराम नेहर हे इच्छुक आहेत. तर आरपीआयकडून अमित मेश्राम, बळवंत वानखडे आणि रामेश्वर अभ्यंकर इच्छुक असून काँग्रेस-आरपीआयची युती झाल्यास कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं असेल.
तर वंचित बहुजन आघाडीने सध्या उमेदवार घोषीत केलेला नाही. इच्छुकांची गर्दी सर्वच पक्षांमध्ये असल्याने पक्षश्रेष्ठीसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे. कुणबी मराठा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात दर्यापूर आणि अंजनगाव ही दोन शहरे निवडणूकीत अत्यंत महत्वाची ठरतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025Top 100 Headlines : शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : Maharashtra News : 27 March 2025 : 7 PMGirish Mahajan : जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं दुखापत, कसा घडला अपघात?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
मोठी बातमी ! दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे जाळ्यात, जिल्ह्यात खळबळ
RCB vs CSK : चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला महत्त्वाचा सल्ला
चेन्नईला चेपॉकमध्ये पराभूत कसं करायचं? दोन्ही संघाकडून खेळलेल्या क्रिकेटरचा आरसीबीला लाखमोलाचा सल्ला
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
Embed widget