Dapoli Vidhan Sabha 2024 Results : दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदमांचा विजय; ठाकरे गटाचे संजय कदम पराभूत
दापोली विधानसभा निवडणूक २०२४ निकाल : यंदाच्या निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघाचा गड शिंदेंच्या शिवसेनेने राखला आहे. शिवसेना पक्षफुटीनंतरची ही पहिली लढत चांगलीच रंजक ठरली.
Dapoli Vidhan Sabha Constituency Election 2024 : दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतर अभूतपूर्व असा विजय मिळवला. तर शिवसेना ठाकरे गटाच्या संजय कदम यांचा पराभव झाला. सद्यस्थितीत दापोली मतदारसंघाचे आमदार हे योगेश कदम हेच होते.
2019 मध्येही योगेश कदमच विजयी
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेले योगेश कदम यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 95 हजार 364 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांना 81 हजार 876 मतं मिळाली. योगेश कदम यांना 52.1 टक्के मतं मिळाली. तर, संजय कदम यांना 44.7 टक्के मतं मिळाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
1. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
उदय सामंत (शिवसेना)
बाळ माने (उबाठा)
विजयी : उदय सामंत (शिवसेना शिंदे गट)
2. राजापूर विधानसभा मतदारसंघ
राजन साळवी (उबाठा)
किरण सामंत (शिवसेना)
अविनाश लाड (अपक्ष)
विजयी : किरण सामंत (शिवसेना शिंदे गट)
3. गुहागर विधानसभा मतदारसंघ
भास्कर जाधव (उबाठा)
राजेश बेंडल (शिंदे गट)
प्रमोद गांधी (मनसे)
विजयी : भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)
4. दापोली विधानसभा मतदारसंघ
योगेश कदम (शिंदे गट)
संजय कदम (उध्दव गट)
संतोष अबगुले (मनसे)
विजयी : योगेश कदम (शिवसेना शिंदे गट)
5. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ
शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
प्रशांत यादव (शरद पवार गट)
विजयी : शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
हेही वाचा: