Dahisar Vidhan Sabha constituency: दहिसर विधानसभा मतदारसंघात विनोद घोसाळकर पराभूत, भाजपच्या मनीषा चौधरी विजयी
Dahisar Vidhan Sabha constituency: दहिसर विधानसभा मतदारसंघातील लढतीचे अपडेटस् आणि निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Dahisar Vidhan Sabha constituency: मुंबईच्या वेशीवर असलेल्या दहिसर विधानसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये दहिसर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मनीषा चौधरी यांनी अनुक्रमे 38 हजार आणि तब्बल 60 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनीषा चौधरी यांच्यासमोर ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर आणि मनसेच्या राजेश येरुणकर यांचे आव्हान होते.
यापैकी विनोद घोसाळकर हे 2009 साली दहिसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. विनोद घोसाळकर हे जुने शिवसैनिक असून या भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. यामुळे दहिसरमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काही महिन्यांपूर्वी विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हे दु:ख बाजुला सारुन घोसाळकर कुटुंबीय पुन्हा एकदा सक्रिय झाले होते. मात्र, या सगळ्यानंतरही यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा चौधरी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
