एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election Results | तब्बल 13 राज्यात काँग्रेसला शून्य जागा
काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातही पक्षाची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार एनडीएला 340 पेक्षा जास्त जागांवर आघाडी असल्याचं दिसत आहे तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना 90 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र काँग्रेसला देशातील 13 राज्यांमध्ये एकही जागा मिळत नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये देखील पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. राजस्थानमधील 25 पैकी एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला नाही किंवा आघाडीवर नाही. यासोबतच 2014 प्रमाणेच यावेळी देखील गुजरातमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. यासोबतच आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मणिपूर, मिझोरम, दिल्ली, ओदिशा, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यांमध्येही काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचं दिसत आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे जिंकूनही शरद पवारांचा ईव्हीएमवर अविश्वास कायम
याशिवाय काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेस फक्त 2 जागांवर आघाडीवर आहे. मध्यप्रदेशमध्ये एका जागेवर काँगेसचा उमेदवार आघाडीवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची अवस्था थोडी चांगली दिसत आहे. सध्या 8 जागांवर पंजाबमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था बिकट
महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. राज्यात काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा नांदेड मतदारसंघात पराभव झाला आहे.
देशातील 'हे' दिग्गज विजयी, 'या' नेत्यांचा दणदणीत पराभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement