विशाल पाटलांना समजावून सांगू, मार्ग काढू, आम्ही महाविकास आघाडी बरोबर : नाना पटोले
विशाल पाटलांना समजावून सांगू, मार्ग काढू, आम्ही महाविकास आघाडी बरोबरच असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं.
Nana Patole congress: सांगली लोकसभेच्या जागेवरुन (Sangli Lok Sabha seat) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता दिसत आहे. कारण, ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी उमेदवाी अर्ज देखील दाखल केला आहे. तर दुसरीकडं काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशा स्थिती मार्ग कसा काढायचा? असा प्रश्न सर्वांसमोरच पडला आहे. दरम्यान, विशाल पाटलांना समजावून सांगू, मार्ग काढू, आम्ही महाविकास आघाडी बरोबरच असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं.
सांगलीतून निवडणूक लढवण्यावर विशाल पाटील ठाम
महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळं सांगली काँग्रसचे नेते नाराज आहेत. सांगलीत काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळं ही जागा काँग्रेसलाच हवी अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतलीय. त्यामुळं निवडणूक लढवण्यावर विशाल पाटील हे ठाम होते. अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय. त्यामुळं सांगली लोकसभेची फाईट आता तिरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपकडून पुन्हा संजय काका पाटील हे निवडणूक लढवत आहेत.
महायुतीत नऊ जागांवरुन महाभारत, पटोलेंची भाजपवर टीका
दरम्यान, विशाल पाटील यांना आम्ही समजावून सांगू, मार्ग काढू असे वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. अजून अर्ज मागे घेण्यास वेळ आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर राहू, या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. यावेळी बोलताना पटोलेंनी भाजपवर देखील टीका केली. आत्ता महायुतीत नऊ जागांचा तिढा अजूनही कायम आहे. तो कसा सोडवायचा? महायुतीत तर महाभारत चाललेलं आहे. आम्ही तर जागा जाहीर केल्या असल्याचे पटोले म्हणाले. लोकांसाठी अजेंडा घेवून आम्ही लोकांमध्ये चाललेलो आहे. भाजपकडे तर तो अजेंड नसल्याचे पटोले म्हणाले. ते मोदींच्या नावानं मत मागत आहेत. मोदींनी गेल्या दहा वर्षात या देशात महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकऱ्यांना संपवलं. गरिबांना संपवलं आणि तेच मोदींच्या नावानं मत मागत असल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळं महायुतीमधील जे महाभारत चाललं आहे ते एक दोन जागेचा नाही तर नऊ जागेचा चालले असल्याचे पटोले म्हणाले.
विदर्भातील पाचही जागा काँग्रेस जिंकेल
अमित शहांच्या सभेसाठी पैसे देवून लोकं आणल्याची टीका पटोलेंनी केली. विदर्भातील पाचही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींनी देशाला साकोलीतून व्हिजन दिलं आहे. त्यामुळं साकोली आता राजकीय केंद्र बनल्याचे नाना पटोले म्हणाले. या निवडणुकीत एक गोष्ट पाहतोय की लोकांनी निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे. लोकांना आता मोदींचं सरकार नकोय. कारण मोदींचं खोटंपण, फेकुगिरी आणि जुमलेबाजी लोकांना आवडत नाही. त्यामुळं त्यांच्या सभेसाठी ही लोकं जमत नसल्याचे नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: