एक्स्प्लोर

भाजपचा काँग्रेसला आणखी एक हादरा, कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची मदत घेऊन मोठे झालेल्या संजयामामा शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी घेतल्याचा राग भाजपला जिव्हारी लागला आहे. यातूनच शिंदेंना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.

पंढरपूर : माढा लोकसभेसाठी भाजपने अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नसली, तरी काँग्रेस आघाडीला हादरे देण्याचं काम सुरुच ठेवलं आहे. माढा विधानसभेसाठी गेल्या निवडणुकीत तब्बल 65 हजार मतं घेणारे काँग्रेस नेते कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आघाडीपुढील अडचणीत मोठी वाढ होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची मदत घेऊन मोठे झालेल्या संजयामामा शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी घेतल्याचा राग भाजपला जिव्हारी लागला आहे. यातूनच शिंदेंना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.  VIDEO | वसंतदादा घराण्याला चंद्रकांत पाटलांची भाजपमध्ये येण्याची ऑफर कल्याणराव काळे हे पंढरपूरचे तरुण नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे दोन साखर कारखाने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात कल्याणराव काळे यांनी तब्बल 65 हजार मतं घेत त्यांना अडचणीत आणलं होतं. आता काळे भाजपमध्ये गेल्यास संजय शिंदेंसमोरच्या अडचणीतही मोठी वाढ होणार आहे.
काँग्रेसला धक्क्यावर धक्के, माणिकराव गावितही पक्ष सोडण्याच्या तयारीत
निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व असलेली मोठमोठी घराणी आघाडीची साथ सोडत सत्ताधारी भाजपच्या गोटात सामील होत आहेत.
मी गद्दारी केली नाही, तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, संजय शिंदेंचं चंद्रकांत पाटलांना उत्तर
यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे, वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. तर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटीलही राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यातच आता माणिकराव गावित, कल्याणराव काळे यांनीही पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget