एक्स्प्लोर

हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश, प्रवेशानंतर म्हणतात...

मी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन पाहिलं नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर अजून हर्ष दिसेल कारण आता तुमच्याकडे हर्षवर्धन आलेला आहे.

मुंबई : माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजप प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजचा ऐतिहासिक दिवस आहे.  आमचा समाज अन्यायग्रस्त समाज आहे. अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ताकद द्यावी. मी कुठलीही अट घालून भाजपात आलेलो नाही, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन पाहिलं नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर अजून हर्ष दिसेल कारण आता तुमच्याकडे हर्षवर्धन आलेला आहे. माझ्या मतदारसंघाची भौगालिक परिस्थिती माहिती आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही.  तुमच्या मनात आलं तर आमच्या जिल्ह्यात धो धो पाणी येईल, असेही ते म्हणाले. यावेळी भाषणादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्ते वगळून सर्वांचा उल्लेख केला. त्यामुळे एका भाजप कार्यकर्त्याने भाषणामध्येच त्यांना 'आम्ही ही आलोय' याची आठवण करून दिली. त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी 'आता मीच भाजपात आलोय. यांना विश्वासच पटेना की मी आलोय' असे म्हणताच एकच हशा पिकला. त्यावेळेस हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत असते तर सुप्रियाताईंनाही घरी पाठवलं असतं - चंद्रकांत पाटील यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या दोन दिवस आधी हा निर्णय घेतला असता तर बारामती बाबतचा संकल्प पूर्ण झाला असता आणि ते खासदार झाले असते.  आम्ही ठरवलं होतं माढा, पवारांना पाडा. मात्र पवारांनी वेळीच माघार घेतली. मात्र त्यावेळेस हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत असते तर सुप्रियाताईंनाही घरी पाठवलं असतं, असे ते म्हणाले.  मात्र ते हुशार राजकारणी आहेत, लोकसभेचा निकाल लागल्यावर बघू असं त्यांनी तेव्हा ठरवलं होतं. नाहीतर ते तेव्हाच भाजपात आले असते. युतीचेच सरकार येणार असून ते मोठ्या बहुमताने येणार आहे. आधी घोषणा केली होती की अब की बार 220 पार, आता ही घोषणा मागे पडली असून आता यापेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.  हर्षवर्धन यांना आश्वस्त करतो की त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही ते म्हणाले. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील, पुत्र राज्यवर्धन पाटील आणि त्यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Embed widget