एक्स्प्लोर
Advertisement
अमित शाहांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, उमेदवारी रद्द करण्याची मागणी
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्या शपथपत्रात स्वतःच्या संपत्तीविषयीची माहिती लपवल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
गांधीनगर : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्या शपथपत्रात स्वतःच्या संपत्तीविषयीची माहिती लपवल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत काँग्रेसने शाहांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. अमित शाह गुजरातमधील गांधीनगर येथून लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत.
अमित शाह यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रामध्ये दोन ठिकाणी चुकिची माहिती दिली असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. शाह यांनी गांधीनगरमध्ये असलेल्या त्यांच्या मालकीच्या एका प्लॉटबाबत आणि मुलाच्या कर्जाबाबत योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अमित शाहा यांना निवडणूक लढवण्यास अयोग्य ठरवून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
2016-17 मध्ये राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना अमित शाह यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न 43 लाख 68 हजार 450 रुपये इतके असल्याचे सांगितले होते. तर त्यांची पत्नी सोनल यांचे वर्षिक उत्पन्न 1 कोटी 05 लाख 84 हजार 450 रुपये इतके असल्याचे सांगितले होते. परंतु 2017-18 मध्ये शाहांचे वार्षिक उत्पन्न 53 लाख 90 हजार 970 रुपये इतके वाढले आहे. तर त्यांची पत्नी सोनल यांचे वार्षिक उत्पन्न 2 कोटी 30 लाख 82 हजार 360 रुपये इतके वाढले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement