एक्स्प्लोर
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार आमच्या कुटुंबातला : सत्यजीत तांबे
सुधीर तांबे हे सत्यजीत तांबे यांचे वडील आणि बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
शिर्डी : राहाता विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार आमच्या कुटुंबातील असेल, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात आमदार सुधीर तांबे उभे राहणार असल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले.
सुधीर तांबे हे सत्यजीत तांबे यांचे वडील आणि बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मुलगा सुजय यांना काँग्रेसकडून अहमदनगरमधून उमेदवारी न मिळाल्याने, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. आता विधानसभा निवडणुकीला त्यांच्याविरोधात उमेदवार कोण असा प्रश्न काँग्रेससमोर होता. सुरुवातीला सत्यजीत तांबे, त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांची नावं चर्चेत होती. आता शिर्डी विधानसभा निवडणुकीत तांबे विरोधात विखे असा सामना झाल्यास विखे विरुद्ध थोरात या वादाचा नवीन अंक जनतेसमोर येईल हे मात्र नक्की.
शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा मुलगा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी नेवासे विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
एकीकडे सर्वजण भाजपा किंवा शिवसेनेत प्रवेश करुन निवडणूक लढवण्यासाठी धडपड करत असताना अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आपला सवता सुभा मांडला आहे. शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या गडाखांनी दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि स्वतःच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाची स्थापना करत तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवत विजय मिळवला आहे. कोणत्याही पक्षात न जाता आता आमदारकीची निवडणूकही अपक्षच लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement