एक्स्प्लोर

Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान

सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत, असे ट्विट करत खासदार कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे : राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असून सायकंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एकीकडे उन्हाचा कडाका जाणवत असताना दुसरीकडे राजकारणही गरम झालं आहे. त्यातच, महाविकास आघाडीच्या शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवारही चौथ्या टप्प्यात लढत आहेत. शिरुर (Shirur) आणि अहमदनगर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी विशेष लक्ष दिले आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि निलेश लंकेंच्या माध्यमातून शरद पवारांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाली लागली आहे. मात्र, पैसेवाटप, बोगस मतदानाचा प्रयत्न आणि दमदाटीच्या आरोपामुळे हे  मतदारसंघात राज्यात चर्चेत आले आहेत. 

सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत, असे ट्विट करत खासदार कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचे म्हटले आहे.कोल्हे यांनी व्हिडिओही ट्विट केला आहे, त्यामध्ये मतदान केंद्रात गोंधळ सुरू असल्याचे दिसून येते. पोलिंग एजंट आणि निवडणूक अधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील संवाद दिसून येत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे बुथच्या परिसरात घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. मतदानाच्या दिवशी निवडणूक चिन्हाचा प्रचार केल्याने आचारसंहितेचा भंग होत आहे, असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.तसेच, आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रातील बुथ परिसरातील घड्याळ चिन्ह असलेल्या स्लीपांचे वाटप बंद करण्याचे तसेच संबंधित पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत, अशीविनंतीही अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरुन केली आहे. 

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 4.97 टक्के मतदान झाले आहे. एकूण 11 लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान झाले असून सर्वात कमी मतदान शिरुर मतदारसंघातच झाल्याचं दिसून येत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 14.51 टक्के मतदान झालं आहे. मात्र, दुपारपासून येथील मतदानाचा आकडा वाढेल, असा अंदाज आहे. 

कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील

शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. येथील मतदारसंघात अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अमोल कोल्हेंनीही दंड थोपटले आहेत. त्यामुळे, या मतदारसंघात सकाळपासूनच कार्यकर्ते मतदानासाठी उत्साहाने कामाला लागले आहेत. 

सकाळी 11 वाजेपर्यंत लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

नंदुरबार - २२.१२ टक्के
जळगाव-  १६.८९ टक्के
रावेर - १९.०३ टक्के
जालना - २१.३५ टक्के
औरंगाबाद  -  १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे - १६.१६ टक्के
शिरूर-   १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१  टक्के
बीड - १६.६२ टक्के

हेही वाचा

Anna Hazare: नगरमध्ये लंके की सुजय विखे, कोणाला मतदान द्यायचं? अण्णा हजारेंनी मतदारांना दिला मेसेज, म्हणाले...

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget