Chopda Vidhan Sabha Constituency: चोपड्यात शिवसेनेत होणार थेट लढत, जनता कोणाच्या पारड्यात विजय देणार? कोण उधळणार विजयाचा गुलाल?
Chopda Vidhan Sabha Constituency: चोपडा विधानसभेच्या जागेवर लोकांनी बराच काळ काँग्रेसला निवडून दिले आहे. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादीने काबीज केली होती.
Chopda Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashtra Assembly Election 2024) शंखनाद फुंकण्यात आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळतेय. यंदा संपूर्ण राज्यात एकाच वेळी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात निवडणुकीचे रंग दिसून येत असून, कोण विजयी ठरणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाची (Chopda Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. महाराष्ट्रातील चोपडा विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 10 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे आणि प्रभाकर सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे. यंदा या निवडणूकीची रंजक झलक पाहायला मिळणार आहे
1995 पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व, शिवसेना राखणार का गड?
चोपडा विधानसभा मतदारसंघ - चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे (Chandrakant Soanwane) यांच्या विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) प्रभाकर सोनवणे (Prabhakar Sonawane) यांच्यात थेट लढत होणार आहे. चोपडा विधानसभेच्या जागेवर लोकांनी बराच काळ काँग्रेसला निवडून दिले आहे. एकदा अपक्ष उमेदवाराचा आणि एकदा जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय वगळता 1995 पर्यंत येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादीने काबीज केली. यानंतर या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत होती. मात्र, गेल्या दोन निवडणुकांपासून येथे शिवसेनेचेच उमेदवार विजयी होत आहेत.
2019 च्या निवडणुकीत काय झाले?
2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर चोपडा येथे शिवसेनेकडून लताबाई चंद्रकांत सोनवणे या रिंगणात होत्या, त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडून जगदीशचंद्र रमेश वळवी रिंगणात होते. याशिवाय या जागेवरून प्रभाकर सोनवणे आणि डॉ. चंद्रकांत बरेला या दोन अपक्षांचेही अर्ज दाखल झाले होते. या निवडणुकीत लताबाईंना 78,137 मते मिळाली. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना एकूण 57,608 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार प्रभाकरप्पा यांना 32,459 मतांवर तर डॉ. चंद्रकांत बरेला यांना 17,085 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत लताबाईंनी 20,529 मतांनी दणदणीत विजय नोंदवला.
महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा कोणाच्या हाती जाणार?
महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्यासाठी 145 जागांचे बहुमत आवश्यक आहे. चोपडा (Chopda) विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 10व्या क्रमांकावर आहे. ही जागा सध्या शिवसेनेच्या लताबाई चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे आहे. यापूर्वीही ही जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी चंद्रकांत सोनवणे आमदार होते.
हेही वाचा>
Erandol Vidhan Sabha Constituency: एरंडोलमध्ये 'पाटलांची' जादू पुन्हा चालणार? चुरशीची लढत! कोण उधळणार विजयाचा गुलाल?