एक्स्प्लोर

छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2018: छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ

गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपाला हादरा बसला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार 90 जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस 66 तर भाजपा 14 जागांवर आघाडीवर आहे. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगडने 9 जागांवर आघाडी मिळवली होती.

रायपूर :  लोकसभेच्या निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपला चांगलाच हादरा बसला आहे.  गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपाला हादरा बसला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार 90 जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस 66 तर भाजपा 14 जागांवर आघाडीवर आहे.  माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगडने 9 जागांवर आघाडी मिळवली होती. गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला काँग्रेसने चांगलेच आव्हान दिले आहे. ‘चावलवाला बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री रमणसिंह यांनी लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावली होती. मात्र ही ताकद अपुरी पडल्याचे हाती आलेल्या निकालावरून स्पष्ट होत आहे. राज्यातील जनमानसात आमची प्रतिमा चांगली आहे. आम्ही केलेल्या कामाच्या बळावर जनता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवेल. छत्तीसगडमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे, असा दावा निकालापूर्वी मुख्यमंत्री रमणसिंह यांनी केला होता, मात्र हा दावा खोटा ठरताना दिसून येत आहे. 90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत काँग्रेसला 39 जागा तर बसपाला एका जागेवर विजय मिळवता आला होता. गेल्या 15 वर्षांपासून छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आहे. गेल्या वेळी भाजपला 41 टक्के तर काँग्रेसला 40.3 तर बसपला चार टक्के मते मिळाली होती. 15 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अजित जोगी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपला नवा पक्ष  (जनता काँग्रेस छत्तीसगड ) निर्माण करत ही निवडणूक रोमांचक बनवली.

Election Result Live Update

 - छत्तीसगडमध्ये भाजपचा सुपडासाफ, काँग्रेस तब्बल  66 जागांवर आघाडीवर, भाजप ऑफिसमध्ये सन्नाटा   -रमणसिंह सरकारमधील 5 मंत्री पिछाडीवर, माजी मुख्यमंत्री अजित जोगींची मोठ्या विजयाकडे वाटचाल  - काँग्रेस 63, भाजप 18,  इतर 09  जागांवर आघाडीवर  - दुप्पट जागांवर काँग्रेसची आघाडी  - रमणसिंहांची सत्ता जाण्याची शक्यता, काँग्रेसला मोठी आघाडी - काँग्रेस 46, भाजप 24, जनता काँग्रेस छत्तीसगड 8, तर इतर 10 जागांवर आघाडीवर  - काँग्रेस 60, भाजप 24,  इतर 6 जागांवर आघाडीवर  - काँग्रेस 56, भाजप 28 तर इतर 6 जागांवर आघाडीवर  - काँग्रेस 54, भाजप 30 तर इतर 6 जागांवर आघाडीवर  - काँग्रेस 48, भाजप 32 तर इतर 7 जागांवर आघाडीवर  - मुख्यमंत्री रमणसिंह राजनांदगाव मतदारसंघातून पिछाडीवर 

- छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर, काँग्रेस 36 , भाजप 30 तर इतर 6 जागांवर आघाडीवर 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील महत्वाच्या गोष्टी

- 90 आमदार असलेल्या छत्तीसगड विधानसभेत बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता आहे.

-  छत्तीसगडमध्ये मागील 15 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. मुख्यमंत्री रमणसिंह 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत.

- छत्तीसगडमध्ये आतापर्यंत चार वेळा निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपने सलग 3  वेळा विजय प्राप्त केला आहे.

- राज्यात 1.85 कोटी मतदारांनी 1,269 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद केले आहे.

- यावेळेस छत्तीसगडमध्ये 76.35 टक्के मतदान झाले आहे.  2013 च्या निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का मतदान कमी झाले आहे.

- छत्तीसगडचा गड सर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 19, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी 12 तर उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 सभा घेतल्या होत्या.

- छत्तीसगडची ही निवडणूक वादग्रस्त वक्तव्यांनी देखील गाजली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
पुणे विद्यापीठात उंदीरमामांचा सुळसुळाट, 2 विद्यार्थ्यांना रेबीजची लक्षणे; विद्यार्थी संघटना संतप्त
Raigad Crime News : चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
चक्क पोलीसच निघाले दरोडेखोर! 7 किलो सोने अवघ्या दिड कोटीत विकण्याचा कट उधळला, 5 जण ताब्यात
Embed widget