VIDEO : मी दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे - छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं.
Chhagan Bhujbal : नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं. विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल, असे छगन भुजबळ म्हणाले. मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यात संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चेला आणखी जोर आला होता. याबाबत एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रसारमाध्यमांकडे सध्या दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे भुजबळांच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
मी नाराज नाही, कुणालाही भेटलो नाही -
मी अतिशय नाराज नाही. मी कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. माझ्या नाराजीच्या चर्चा फक्त प्रसारमाध्यमांनीच सुरु केल्या. मी नाराज असल्याच्या चर्चा साफ खोट्या आहेत. मी नाराज नाही, मी कुणालाही भेटलो नाही. आमच्या विरोधीपक्षातील नेत्याला भेटलेलो नाही. त्यांना कधी भेटणार... मला वेळच नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
नाराजीच्या चर्चेनंतर भुजबळांनी सगळा कार्यक्रमच सांगितला.
10 तारखेला षणमुखानंद हॉल येथे कार्यक्रमात होतो.
11 तारखेला आमच्या लोकांसोबत होतो.
12 तारखेला अजित पवारांच्या घरी बैठकीला होतो.
13 तारखेला राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी गेलो.
14 तारखेला पुण्यात होतो.
15 तारखेला मी येवल्यात होतो.
16 तारखेला मी मुंबईत होतो.
मला कुणाला भेटायचं असेल तर मी उघडपणे भेटेल, असे भुजबळ म्हणाले. चॅनलला जोपर्यंत नवीन काही भेटत नाही, तोपर्यंत भुजबळ भुजबळ चालेल.
राजकारणात नाराज होऊन चालत नाही -
मी नाराज नाही. राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होतो अन् दुसऱ्या दिवशी कामला लागतो. कमी जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज असतील, मोदीसाहेबही नाराज असतील. शरद पवारही नाराज असतील.. देवेंद्र फडणवीसही नाराज असतील.. अजित पवारही बारामतीची जागा का गेली, त्यामुळे नाराज असतील. ज्याप्रमाणे नाराजीनंतर सर्व नेते कामाला लागले, तसेच मीही कामला लागलोय. मी नाराज नाही. किंवा कुणालाही भेटलो नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
समता परिषदेची बैठकीत काय झालं ?
समता परिषदेची बैठक अद्याप झालेली नाही. पुढील पाच सहा दिवसात होईल. काही लोक मला भेटायला आले होते. बीड, बारामती जागा का गेली, अडचणी का आल्या..विदर्भात जागा का कमी आल्या. राज्यसभेला उभं का नाही राहिलात, याबाबत चर्चा झाली. मला भेटायला आलेले लोक त्या त्या भागात काम करतात. तेथील माहिती मला हवी होती. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला. त्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा झाली नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.