एक्स्प्लोर
Advertisement
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी होण्याची शक्यता, उद्या प्रवेश होणार?
छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील शिवसैनिक मातोश्रीवर गेले होते. मात्र आता भुजबळ शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. याआधीही जेव्हा भुजबळांच्या शिवसेनेतील प्रवेशावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलेलं, तेव्हा वेळ येईल, तेव्हा सगळं कळेलच, अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. तेव्हापासूनच भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आलं होतं.
छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील शिवसैनिक मातोश्रीवर गेले होते. मात्र आता भुजबळ शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांशी शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंची खबलतं झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तब्बल 29 वर्षांनी भुजबळांची घरवापसीची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा नाशिकमध्ये आली होती. तेव्हा छगन भुजबळ त्यांच्यासोबत नव्हते. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या पक्षबदलाच्या चर्चेने आणखी जोर पकडला. नाशिक हा काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला होता. पण आता तशी स्थिती राहिलेली नाही.
छगन भुजबळ यांच्या राजकारणाची सुरुवात 60 च्या दशकात शिवसेनेतून झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. 25 वर्ष शिवसेनेत असताना शाखा प्रमुखपदापासून मुंबईचे महापौर, आमदार अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. 1991 साली शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. तिथेही त्यांनी उपमुख्यमंत्रीपदासह विविध पदे भूषवली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement