किशोर जोरगेवारांच्या पक्षप्रवेशाला सुधीर मुनगंटीवारांचा विरोध, थेट दिल्ली गाठली! तर चंद्रशेखर बावनकुळेंची मध्यस्थी, म्हणाले...
Chandrasekhar Bawankule: आमदार किशोर जोरगेवार यांचा पक्षप्रवेशाच्या मुद्यावर भाष्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टोक्ती देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 चंद्रपूर: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. अशातच चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या संभावित भाजप प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे दिल्लीला रवाना झाले असून अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत भेट घेऊन जोरगेवार यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान याच मुद्यावर भाष्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी स्पष्टोक्ती देत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) हे संपर्कात आहे. मात्र भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच सुधीर मुनगंटीवार यांचा समन्वयाने त्यांना पक्षात प्रवेश होईल. याबत आम्ही त्यांच्याशी बोलू. अशी स्पष्टोक्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली आहे.
तीन नेत्यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश
आर्णीचे माजी आमदार राजू तोडसाम हे आज भाजपमध्ये आले आहेत. तर मूर्तीजापूरचे रवी राठी यांचा ही पक्ष प्रवेश झाला आहे. तर मोर्शीचे उमेश यावलकर यांनीही पक्षप्रवेश केला आहे. या तिन्ही पक्ष प्रवेशाने भाजप पक्षाला फायदा होईल. तिघांचे भाजपकडून मी अभिनंदन करतो, भाजप त्यांचा पाठीशी कायम उभे राहिल. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणले.
नागपुरातील विविध जागांसाठी अनेक नावे, मात्र...
नागपूर जिल्ह्यातील विविध जागांसाठी खूप नावे आहेत. यात काटोल, सावनेर, उमरेड, मध्य नागपूर, पश्चिम नागपूर आणि उत्तर नागपुरातील अनेक नावे आहे. याबाबत पॅनल केले आहे. तर उमेदवारीबद्दल केंद्रीय पार्लमेंटट्री बोर्ड निर्णय घेईल. असेही बावनकुळे म्हणले. दरम्यान, केंद्रिय पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणीही फॉर्म भरू नका, अशा सर्व सूचना भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.असेही ते म्हणाले.
नवाब मलिकांच्या संदर्भात अजित पवार कुठलाही निर्णय घेणार नाही
दरम्यान, निवडणुकीच्या या रणधुमाळीत माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ते यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असे विचारले जात होते. असे असतानाच आता नवाब मलिक आणि त्यांची कन्या सना मलिक (Sana Malik) हे दोघेही विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) लढवणार आहेत, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, यावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नवाब मलिक या संदर्भात कुठलाही निर्णय अजित पवार घेणार नाही, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच अजित दादा यांच्याशी चर्चा झाली आहे. मोर्शीचा पक्ष प्रवेश उमेदवारीशी संबंधित नाही. वरुड मोर्शी कोणाकडे राहील यावरही चर्चा होईल. भाजप पक्षाची भूमिका आहे, कोणाच्या उमेदवारीला विरोध नाही. जर कर्तृत्व असेल तर त्यांना उमेदवारी दिली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
हे ही वाचा