एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: सत्तेचा, यंत्रणेचा वापर करून भाजपला राज्यात यश; मात्र 'चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं'; दणदणीत विजयानंतर वडेट्टीवारांची बोलकी प्रतिक्रिया

Chandrapur Election Result 2025: चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देत 'चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं' असं म्हटलंय.

Chandrapur Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरात एकीकडे नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निकाला (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) भाजप आणि मित्रपक्षाला भरघो यश मिळाल्याचे चित्र असताना चंद्रपूर मात्र त्याला अपवाद ठरला आहे. चंद्रपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या होमपिचवर काँग्रेसने मोठं यश संपादन केलं आहे. चंद्रपुरात 11 पैकी 8 जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तर भाजपला आणि शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 1-1 जागी समाधान मानावं लागलंय. तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देत 'चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं' असं म्हटलं.

Vijay Wadettiwar : चंद्रपूर हा पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवणारा जिल्हा काँग्रेसने गड राखला

सर्वांची एकत्र मेहनत, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि जनतेचा आशीर्वादाचे हे फळ आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर हा पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवणारा जिल्हा आहे. चंद्रपूर काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा आहे. म्हणूनच भाजपला 11 पैकी 1 जागा मिळाली आहे. भाजपाला बाकी ठिकाणी यश मिळाले असलं तरी काँग्रेसने चंद्रपूरचा गड राखला आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशा हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश आहे. चंद्रपूर हा पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवणारा जिल्हा आहे. त्यामुळे हे यश मिळालं आहे. चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं. अशी बोलकी प्रतिक्रियाकाँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सत्तेचा, यंत्रणेचा वापर करून भाजपला राज्यात यश मिळालं आहे. निवडणूक आयोगाचे सहकार्य देखील भाजपला आहे. मात्र आम्ही या जिल्ह्यात या सर्व गोष्टींना थारा लागू दिला नसल्याचेही ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भाजपला जिल्ह्यात यश मिळालं नाही का? या प्रश्नावर वडेट्टीवार खळखळून हसले आणि मंत्रीपद मिळालं असतं तरी आम्ही जिंकलो असतो असं उत्तर त्यांनी दिलं.

चंद्रपूर जिल्हा

काँग्रेस : 7
शिंदे शिवसेना : 1
भाजप : 2
अपक्ष (भाजप बंडखोर) : 1

भद्रावती नगराध्यक्ष : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी विजयी

वरोरा नगराध्यक्ष  : काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी

मूल नगराध्यक्ष : काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी

राजुरा नगराध्यक्ष  - काँग्रेसचे अरुण धोटे विजयी

गडचांदूर नगराध्यक्ष  - अपक्ष (भाजप बंडखोर) निलेश ताजने आघाडीवर

नागभीड नगराध्यक्ष : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी

ब्रम्हपुरी नगराध्यक्ष : काँग्रेसचे योगेश मिसार विजयी

चिमूर नगराध्यक्ष : भाजपच्या गीता लिंगायत विजय

घुग्गुस नगराध्यक्ष : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के आघाडीवर

बल्लारपूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अलका वाढई आघाडीवर

भिसी (नगरपंचायत) नगराध्यक्ष : भाजपचे अतुल पारवे विजयी

आणखी वाचा

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget