एक्स्प्लोर
बोरीवली विधानसभा मतदारसंघ : भाजपचा बालेकिल्ला विनोद तावडे कायम राखणार?
मोदी लाटेमुळे आणि भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ असल्याने विजयी होणं विनोद तावडेंना फार काही कठीण गेलं नाही. अजूनही विनोद तावडेंविरोधात अशाच प्रकारची नाराजी असल्याचं चित्र आहे. शिवाय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क पूर्वीसारखा राहिला नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे.
बोरीवली मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण मागील 20 वर्षापासून या मतदार संघामध्ये भाजपचा वर्चस्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडेनी या मतदार संघातून निवडणूक लढवून भरघोस मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे यंदा सुद्धा आगामी निवडणूकांसाठी या मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून विनोद तावडे यांचा नाव निश्चित मानलं जातंय
बोरीवली मतदारसंघामध्ये कोणाची ताकद?
बोरीवली मतदारसंघ हा मराठी आणि गुजराती भाषिक मतदारांचा आहे. त्यामुळे मराठी आणि गुजराती मतदारांवर या ठिकाणचं गणित अवलंबून आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 1 लाख 27 हजारांच्या आसपास गुजराती मते असली तरी मराठी भाषकांची 1 लाख 23 हजारांच्या दरम्यान असणारी मतं निर्णायक भूमिका बजावणारी होती. यावर्षी जर मनसे आघाडीत सामील झाली तर या मराठी मतांचं विभाजन होऊ शकतं.
कारण या निवडणुकीत मनसेचे उमेदवार असलेले आणि याआधी 2014 ची निवडणूक लढवलेले नयन कदम सुद्धा उमेदवार म्हणून उभं राहण्यास इच्छुक आहेत. तर विनोद तावडेंसमोर काँग्रेसकडून माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि कुमार खिल्लारे यांनी उमेदवारी मागितली असून त्यांच्याऐवजी नवीन उमेदवाराला सुद्धा संधी मिळू शकेल, अशी चर्चा आहे.
शिवानंद शेट्टी हे काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय, मराठी सोडून इतर मते त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. शिवाय मनसे आघाडी सामील झाल्यास त्यांना मराठी मते सुद्धा मिळू शकतील. त्यामुळे विनोद तावडे यांना मागील निवडणुकीपेक्षा काही प्रमाणात तगडं आव्हान मिळू शकतं.
भाजपचा बालेकिल्ला विनोद तावडेंसाठी किती सुरक्षित?
युतीकडून विनोद तावडेंचं नाव निश्चित असलं तरी विनोद तावडे यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडून विशेष रणनीती आखली जाणार असल्याची चर्चा आहे. विनोद तावडे हे बोरीवलीचे स्थानिक नसून ते विलेपार्ले भागात राहतात. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीमुळे त्यांच्याविरोधात भाजपच्या काही स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात नाराजीचा सूर होता. मात्र, मोदी लाटेमुळे आणि भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ असल्याने विजयी होणं त्यांना फार काही कठीण गेलं नाही. अजूनही विनोद तावडेंविरोधात अशाचप्रकारची नाराजी असल्याचं चित्र आहे. शिवाय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क पूर्वीसारखा राहिला नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे.
बोरीवली मतदारसंघामध्ये गोराई खाडी भागात अद्याप मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं मतदारांचं म्हणणं आहे. झोपडीपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप या भागात सुटलेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विनोद तावडे क्रीडा मंत्री असून सुद्धा काँग्रेसच्या काळात मंजूर झालेली क्रीडा संकुलची जागा अद्याप पडून आहे. कोणतेही काम तिथे न झाल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जाते.
त्यामुळे या सर्वगोष्टीचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो. शिवाय, वेगळी रणनीती आखून आघाडीचा उमेदवार या निवडणुकीत भाजपचा 20 वर्षापासूनचा गड आपल्याकडे ओढून आणेल का ? हे येणाऱ्या काही दिवसात कळेल.
बोरीवली मतदारसंघ हा बोरीवली लोकसभा मतदारसंघात येत असल्याने, विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा आघाडीच्या उमेदवारांना गुजराती मतदारांचं मतदान मिळवण्यासाठी मदत होते.
बोरीवली मतदारसंघाचा इतिहास आणि भौगोलिक स्थिती -
हा मतदार संघ 1951 मध्ये तयार झाला. आधी काँग्रेसच्या मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ 1980 पासून भाजपकडे आजतगायत आहे. राम नाईक, हेमेंद्र मेहता, गोपाळ शेट्टी आणि आता विनोद तावडे यांनी हा मतदारसंघ भाजपसाठी राखून ठेवला आहे. बोरीवलीमध्ये व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात असून उपनगरातील अनेक महत्त्वाची ठिकाणं या मतदारसंघात येतात. बोरीवली नॅशनल पार्कसोबत विनोद तावडे यांच्या कारकीर्दीत अटल स्मृती स्थळ या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात आलं आहे.
बोरीवली मतदार संघ 152
एकूण मतदान केंद्र - 310
2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
1) विनोद तावडे, भाजप -1,08,278
2) उत्तमप्रकाश अगरवाल, शिवसेना - 29,011
3) नयन कदम, मनसे - 21,765
4) अशोक सुतराळे, काँग्रेस - 14,993
5) नोटा - 2056
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement