एक्स्प्लोर

Nawab Malik : नवाब मलिक यांच्या विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, याचिककर्त्याच्या भूमिकेवर सवाल, नेमकं काय घडलं?

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीनगर मानखुर्दचे उमेदवार नवाब मलिक यांच्या विरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टानं नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याबाबत दाखल करण्यात आलेली याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. सॅमसन अशोक पाथरे या व्यक्तीनं नवाब मलिक आणि ईडीला प्रतिवादी करत याचिका दाखल केली आहे.

 मुंबई हायकोर्टात काय घडलं?

नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याबाबतची याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन असल्याचं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं. नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणा-या याचिकाकर्त्यांच्या भूमिकेवर सवाल देखील उपस्थित करण्यात आले. या प्रकरणी दोन आठवड्यांत याचिकेत अधिक पुरावे सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून जारी करण्यात आले आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन देताना दिलेल्या शर्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप सॅमसन पाथरे या व्यक्तीनं केला होता. त्यानं दाखल केलेल्या याचिकेत नवाब मलिकांसह ईडीलाही प्रतिवादी करण्यात आलं होतं. नवाब मलिक यांनी पाथरे या व्यक्तीच्या याचिकेला विरोध केला होता.  9 डिसेंबर 2024 रोजी नवाब मलिकांच्या मूळ जामीनाच्या अर्जासोबत यावर याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगरमध्ये रिंगणात

नवाब मलिक यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ बदलला आहे. गेल्या निवडणुकीत ते अणूशक्तीनगर मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी नवाब मलिक यांनी मतदारसंघ बदलला आहे. नवाब मलिक यांनी अणूशक्तीनगर मतदारसंघातून त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तिथं त्यांच्यासमोर समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांचं आव्हान आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार, नवाब मलिक यांची भूमिका

नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. महायुतीत भाजप आणि शिवसेनेनं नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं तिथं सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी देखील ते महायुतीचे उमेदवार नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचं म्हटलं. 

दरम्यान, सॅमसन पाथरेच्या याचिकेवर पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार असल्यानं नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. 

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget