एक्स्प्लोर

BMC Election 2026 : मोठी बातमी, मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार, महायुतीचा मुंबईचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

BMC Election 2026 मुंबई : महायुतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजप आणि शिवसेनेचा ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर नंतर मुंबईचा फॉर्म्युला देखील जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.  मुंबई महापालिकेत महापौरपद भाजप कडे, स्थायी समितीचं अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या  शिवसेनेला उपमहापौर पद मिळण्याची शक्यता आहे.  यामुळं मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

BMC Election 2026 :  मुंबईत भाजपचा महापौर, शिवसेनचा उपमहापौर 

महापालिकेतील सत्ता समीकरणांसदर्भात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत वेगवेगळी बैठक झाली होती, त्या बैठकीत मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे. 

महायुतीत येणाऱ्या काळात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेलाही मिळेल, मात्र आता ही दोन्ही पदं भाजपकडे राहणार असल्याची शक्यता आहे.  प्रभाग समिती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.  

ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर इथे शिवसेनेचा महापौर आणि भाजपच्या उपमहापौर असेल. तर, मुंबईत भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेत भाजपचा दुसऱ्यांदा महापौर

मुंबई महापालिकेत भाजपचे यापूर्वी प्रभाकर पै महापौर बनले होते. ते 1982 मध्ये मुंबईचे महापौर होते. आता पुन्हा एकदा मंबई महापालिकेत भाजपचा महापौर होणार आहे. तब्बल 25 वर्षानंतर ठाकरेंची मुंबई महापालिकेतील सत्ता जाऊन महापौरपदी भाजपकडे येणार आहे. यापूर्वी अनेक वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती होती.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24 
मनसे - 6 
एमआयएम- 8 
एनसीपी - 3 
एसपी - 2 
एनसीपी शप - 1 
--------------
एकूण- 227

ठाणे, कल्याण डोंबिवलीत महापौर पद शिवसेनेकडे

ठाणे महापालिकेच्या महापौदपदासाठी शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर, उपमहापौरपदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या हर्षाली थविल यांचा महापौरपदासाठी अर्ज

कल्याण डोंबिवली महापालिका महापौर पदाचा उमेदवारी अर्ज हर्षाली थविल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. हर्षाली थविल यांची महापौरपदी बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा 3 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.  तर उपमहापौर राहुल दामले यांचा भाजपकडून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने दामले यांची उपमहपौर पदी बिनविरोध निवड झाली आहे.   

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Embed widget