काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे आव्हान; काल भाजपमध्ये प्रवेश, आज साकोलीतून उमेदवारी
Election 2024: भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा तिढा अखेर आज सुटला आहे. भंडाऱ्याच्या साकोली येथून भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी बाकीअसून भाजपची (BJP) 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या तिसऱ्या यादीत तीन विद्यमान आमदारांना डच्चू देण्यात आली आहे. तर नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्याला संधी देत निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. यात चंद्रपूरातून किशोर जोरगेवार यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोगरेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता.
तर भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा तिढा अखेर आज सुटला आहे. भंडाऱ्याच्या साकोली येथून भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अविनाश ब्राह्मणकर यांनी कालचं भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा जिल्हा परिषदेचे गटनेते होते. एक कुणबी चेहरा म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांच्याकडं बघितला जातं. साकोलीत आता थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर या दोघांमध्ये थेट लढत होण्याचं चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे आव्हान असून यात कोण बाजी मारणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
भाजप उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांची पहिली प्रतिक्रिया
विधानसभेची उमेदवारी भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांना जाहीर झाली. ही उमेदवारी साकोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी दिलेली जबाबदारी असून यात विरोधकांवर नक्कीच विजय संपादन करू. असा विश्वास ब्राह्मणकर यांनी बोलून दाखवला आहे. साकोली विधानसभा क्षेत्र अनेक बाबतीत मागे पडलेला आहे. नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून या निवडणुकीत याचा परिणाम नक्कीच दिसेल. अशी पहिली प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी दिली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्षाची भंडाऱ्यात बंडखोरी
भंडारा विधानसभेसाठी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी लोक वर्गणीतून जमा केलेली एक - दोन रुपयांच्या चिल्लर नाण्यांची पाच हजार रुपयांची रक्कम निवडणूक आयोगाकडं उमेदवारी अर्ज दाखल करताना जमा केली आहे. अजय मेश्राम यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या चिल्लर रकमेची आता चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा