एक्स्प्लोर

शेवटी आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलतोय, सुरेश धसांच्या कानपिचक्या

आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पक्षातील नेत्यांवर टीका करताना पशु-पक्ष्यांचा छंद असलेल्या राजाची गोष्ट सांगितली. सर्वात शेवटी आलेला पोपट राजाच्या कानात मिठू-मिठू बोलत असून त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावं लागल्याचं धस म्हणाले.

बीड : सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे, त्यामुळेच मला पक्षातून बाहेर पडायला लागलं, अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. बीडमधील कडामध्ये भाजपच्या सभेत सुरेश धस यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करत सर्वांनाच पोट धरुन हसायला लावलं. सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पक्षातील नेत्यांवर टीका करताना पशु-पक्ष्यांचा छंद असलेल्या राजाची गोष्ट सांगितली. सर्वात शेवटी आलेला पोपट राजाच्या कानात मिठू-मिठू बोलत असून त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावं लागल्याचं धस म्हणाले. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात वाद लावल्याचं खापरही धसांनी 'मिठू'च्या नावावर फोडलं. 'एका राजाला पशु-पक्ष्यांचा छंद होता. सर्वांना राजाकडून सारखी माया लावली जात होती. पण शेवटी आलेल्या पोपटावर राजाचा खूपच जीव जडला. पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे. राजालाही फक्त त्याचंच खरं वाटायला लागलं आहे. त्यामुळेच आपल्याला पक्षातून बाहेर पडावं लागलं. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातलं भांडणही त्यामुळेच लागल्याचा टोला सुरेश धस यांनी लगावला. VIDEO | राष्ट्रवादीत आता रॉकेल ओतणारे लोक शिल्लक : सुरेश धस | हॅलो माईक टेस्टिंग लोकसभेनंतर हा पोपट नसेल असा विश्वासही सुरेश धस यांनी व्यक्त केला. मात्र आता हा पोपट कोण असा सवाल उपस्थित होत आहे. बीडमध्ये भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. मात्र राष्ट्रवादीला खिंडार पाडत आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि प्रीतम मुंडेंना पाठिंबा दर्शवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Embed widget