एक्स्प्लोर

Uma Khapre : पंकजा मुंडेंना डावलून विधानपरिषदेसाठी संधी मिळालेल्या उमा खापरे कोण?

BJP Announce MLC Election Candidate Uma Khapre: भाजपने विधानपरिषदेसाठी पाच जणांच्या नावाची घोषणा केलीय. पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची वर्णी लागली आहे.  

BJP Announce MLC Election Candidateराज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याने मुंडे समर्थक नाराज आहेत. 

 उमा खापरे यांना महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी दिल्याची चर्चा

पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची वर्णी लागली आहे.  उमा खापरे या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.  पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका (1997 आणि 2002)  होत्या. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत एकदा विरोधी पक्ष नेत्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं.  महिला मोर्चा पदाधिकारी,  प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा ते महिला प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.  तीस वर्षांपासून भाजपच्या कट्टर समर्थक आहेत. महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी दिल्याची चर्चा आहे.

भाजपच्या उमेदवार यादीची वैशिष्ट्ये

संघटनेत काम करणाऱ्या दोन उमेदवारांना उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देऊन भाजपने कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.

तसेच यावेळी भाजपने घटक पक्षाला उमेदवारी दिली नाही.

पंकजा मुंडे की चित्रा वाघ या चर्चेत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणं टाळलं त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना कुठली संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
 
पराभूत झालेल्या राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात आलं, ओबीसी चेहरा म्हणून संधी

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20  जून रोजी निवडणूक

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20  जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget