एक्स्प्लोर

Bihar Exit Poll : बिहारमध्ये पुन्हा NDA चे सरकार, जनतेचा भाजपला कौल; पहिल्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर, तेजस्वी यादवांना किती टक्के मतदान?

Bihar Election Exit Poll Result 2025 : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 64 टक्के तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 67 टक्के मतदान झालं आहे. त्याचे आता एक्झिट पोल समोर येत आहेत.

Bihar Election Exit Poll Result 2025 : बिहार निवडणुकीसाठीचा पहिला एक्झिट पोल प्रसिद्ध झाला आहे असून त्यातून धक्कादायक निकाल समोर येत आहे. MATRIZE-IANS च्या एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये NDA ला 147 ते 167 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महागठबंधनला 70 ते 90 जागा मिळतील असे म्हटले आहे.

बिहार निवडणुकीसाठी MATRIZE-IANS च्या एक्झिट पोलनुसार, NDA ला 48 टक्के, महाआघाडीला 37 टक्के आणि इतरांना 15 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.

Bihar Assembly Election : दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार

बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. दोन्ही टप्प्यात मिळून एकूण 243 जागांसाठी मतदान पार पडलं असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 64.66 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यासाठीही चुसशीनं मतदान झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे बिहारच्या सत्तेची चावी राष्ट्रीय जनता दल प्रणित महागठबंधनकडे जाणार की भाजप-जदयू सत्ता कायम ठेवणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलने143 जागा लढवल्या आहेत. त्याचवेळी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने 168 ठिकाणी उमेदवार उतवरले आहेत

Bihar Assembly Election Update : बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. त्यामध्ये 64.66 टक्के मतदारांना मतदानाचा हक्क बजावला.

बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला पार पडलं. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांसाठी घेण्यात आलं. बिहार निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 122 जागांसाठी 1,302 उमेदवार रिंगणात होते. बिहार निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.

NDA Seat Distribution Details : एनडीए जागावाटपाचा तपशील

भाजप (BJP) – 101 जागा

जदयू (JDU) – 101 जागा

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा

राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा

Mahagathbandhan Seat Distribution Details : महागठबंधन जागावाटपाचा तपशील

राष्ट्रीय जनता दल (RJD) — 143 जागा

काँग्रेस (INC) — 61 जागा

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI ML) - 20 जागा

विकसनशील इंसान पार्टी (VIP) — 12 जागा

Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल

एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243

राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79

भारतीय जनता पक्ष (BJP) – 78

जनता दल (युनायटेड) – JD(U) – 45

काँग्रेस (Congress) – 19

CPI (Marxist–Leninist) Liberation – 12

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4

CPI – 2

CPI (M) – 2

AIMIM – 1

अपक्ष आमदार (Independent MLA) – 1

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget